अध्यात्मिकदेश विदेशमावळसामाजिक

अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिरासाठी मावळातून जाणार स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल..

कामागारांना मिठाई वाटून कंटेनर अयोध्येकडे रवाना..

Spread the love

अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिरासाठी मावळातून जाणार स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल ; कामागारांना मिठाई वाटून कंटेनर अयोध्येकडे रवाना..

आवाज न्यूज  तळेगाव दाभाडे, वार्ताहर ११ सप्टेंबर.

अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या कामात आपला हातभार लागावा, अशी अनेकांची इच्छा आहे. येथे साकारत असलेल्या श्रीराम मंदिर परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वापरण्यात येत असलेले स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल मावळातील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या सिद्धीविनायक प्री कास्ट पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून पुरवले जात आहे. यातील पहिला कंटेनर अयोध्येकडे रवाना करण्यात आला. कामगारांना मिठाई वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपचे संस्थापक यशस्वी उद्योजक रामदास काकडे व युवा उद्योजक संदीप वनवारी, रणजीत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंटेनरचे पूजन नवलाख उंब्रे व जाधववाडी ग्रामस्थ व कामागारांच्या हस्ते करून व मिठाई वाटून कंटेनर अयोध्येकडे रवाना करण्यात आला. यावेळी मावळ तालुका जमीन हक्क परिषदेचे तालुकाध्यक्ष दिनकर शेटे, विकास सोसायटी चेअरमन तानाजी पडवळ, संतोष नरवडे, काळूरम जाधव, बळीराम मराठे, अनिल कोतुळकर, रामदास यादव, रवींद्र गोडबोले यांच्यासह नवलाख उंबरे जाधववाडी ग्रामस्थ, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिर परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल आवश्यक असते. सुंदर डिझाईन केलेले मटेरियल मावळातील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या सिद्धीविनायक प्री कास्ट पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बनविले जात आहे. या मटेरियलचे तब्बल 80 ते 100 कंटेनर अयोध्येला जाणार असून, हे मटेरियल वापरून 5 ते 6 किलोमीटर लांबीची पावसाळी पाण्याची वाहिनी टाकण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान बॉर्डरवरही हेच मटेरियल पुरवले जात आहे.

या माध्यमातून खऱ्या अर्थाने भव्यदिव्य श्रीराम मंदिराच्या कामात मावळवासियांनी महत्त्वचा वाटा उचलला आहे. ‘जय श्रीराम’चा नारा देत हे मटेरियल अयोध्येला पाठवण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!