मावळसामाजिक

मळवली सदापूर आंबेकर मळा मार्गे दोन किलोमीटर रस्ता खड्डेमय..

खडी टाकण्याची ग्रामस्थांची मागणी .

Spread the love

मळवली सदापूर आंबेकर मळा मार्गे दोन किलोमीटर रस्ता खड्डेमय ;खडी टाकण्याची ग्रामस्थांची मागणी.Two kilometers of road through Malwali Sadapur Ambekar Mala is potholed; Villagers demand to put gravel.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १७ सप्टेंबर.

मळवली सदापूर आंबेकर मळा मार्गे दोन किलोमीटर रस्ता खड्डेमय झाला आहे. खोल खड्डेचखड्डे पडल्यामुळे या रस्त्यावर वाहने चालवणे कसरत करण्यासारखे आहे.या खड्ड्यांमधे डांबरमिस्रीत खडी टाकण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

मळवली सदापूर या दोन ते अडीच किलोमीटर मार्गावर आंबेकर मळा ही सात आठ घरांची लोकवस्ती आहे. या आंबेकर मळा येथील ग्रामस्थ अनेक वेळा या ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. सदापूर मळवली ग्रामपंचायतीचे कामकाजात सदापूर गावाचे तीन सदस्य , तसेच येथील आजीमाजी सदस्य, सरपंच, उपसरपंच ही पदे भूषविलेली आहेत.

असे असताना मळवली सदापूर या मार्गावर चांगल्या प्रकारे खडीकरण व डांबरीकरण झालेले नाही.यामुळे येथील फुल उत्पादक शेतकरी, पाण्याचा टँकर असणारे शेतकरी, लहान मोठा व्यवसाय करणारे दुग्धव्यावसायिक, येथील  काही बंगलो, सोसायटी यांचे कडे येणाऱ्या जाणाऱ्या शेकडो पर्यटकांना ञास होत आहे. मळवलीजवळ संपर्कबालग्रामतर्फे चालविली जाणारी शाळा लीली माध्यमिक विद्यालय, तसेच आयटीआय आणि आरोग्य केँद्रात येणारे विद्यार्थी, रूग्ण यांचे हाल होत आहेत.

 

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने येथे डांबरमिस्रीत खडी टाकावी व रस्त्याचे काम करावे, अशी मागणी भाजे विकास सोसायटीचे चेअरमन दत्ताञेय ढाकोळ, प्रगतीशील शेतकरी मदन आंबेकर, नारायण आंबेकर , हनुमंत आंबेकर , माजी ग्रामपंचायत उपसरपंच अश्विनीताई आंबेकर, प्रगतीशील शेतकरी नाथा ढाकोळ, माजी सरपंच एकनाथ आंबेकर यांनी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!