अध्यात्मिकनगरपरिषदसामाजिक

गणेशोत्सव  २०२३ च्या पुर्व तयारीसाठी मुख्याधिकारी दालनामध्ये नगरपरिषदेच्या सर्व विभागप्रमुख व कर्मचा-यांची बैठक संपन्न ..

मुख्याधिकारी एन. के. पाटील.यांनी विभागप्रमुखांना दिल्या सुचना..

Spread the love

गणेशोत्सव  २०२३ च्या पुर्व तयारीसाठी मुख्याधिकारी दालनामध्ये नगरपरिषदेच्या सर्व विभागप्रमुख व कर्मचा- यांची बैठक संपन्न ..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७ सप्टेंबर.

गणेशोत्सवाचे पावित्र्य राखताना पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने विसर्जन मिरवणूक मार्ग दुरुस्ती, निर्माल्य व्यवस्थापन, विसर्जन स्थळ स्वच्छता व सुरक्षितता, आदी विकासकामांवर मुख्याधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयांवर चर्चा झाली

मुख्याधिकारी दालनामध्ये नगरपरिषदेच्या सर्व विभागप्रमुख व कर्मचा- यांची गणेशोत्सव २०२३ च्या पुर्व तयारीसाठी मिटिंग घेण्यात आली. सदर मिटिंगला नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख व जबाबदार कर्मचारी उपस्थित होते. सदर मिटिंगमध्ये तळेगाव दाभाडे शहरातील सन २०२३ च्या गणेश उत्सवाच्या तयारीसाठी सर्व विभागप्रमुखांना खालीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहेत.

बांधकाम विभाग. विसर्जन मार्गावरील व मिरवणूक मार्गावरील रस्ते खड्डे बुजविणे, विसर्जन केंद्र ठिकाणी कृत्रीम कुंड तयार करून घेणे, “कृत्रीम कुंडाकरिता लागणारे प्लास्टिक आवरणाचे माप भांडार विभागास कळविणे. नगररचना विभागा नगरपरिषद हद्दीतील गणेश मंडळांना नियमाप्रमाणे आवश्यक असलेल्या परवानग्या देणे.

विद्युत विभाग गणपती विसर्जनासाठी ठरविण्यात आलेल्या सर्व ठिकाणी आवश्यकते प्रमाणे विद्युत व्यवस्था करणे, नगरपरिषद क्षेत्रातील पारंपारिक पद्धतीने विसर्जन व मूर्तीदान करावयाच्या जागांवर विद्युत व्यवस्था करणे. (मुख्य तलाव तसेच इतर ठिकाणी), सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत अनाधिकृत रित्या विजेचा वापर केला जाणार नाही याची दक्षता घेणे, मिरवणूक मार्गात विद्युत वाहिनींमुळे अडथळा निर्माण होऊन

अपघात होणार नाहीत यासाठी योग्य त्या उपयोजना करणे.

संगणक विभाग : सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेले CCTV सुस्थितीत राहतील याची खात्री करणे. ५) आरोग्य विभागा- गणपती विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जनाकामी जे.सी.बी च्या सहाय्याने खड्डे करणे, गणपती विसर्जन स्थळी व सार्वजनिकमंडळांचे निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करणे, विसर्जन ठिकाणावरील स्वच्छता करणे, विसर्जन स्थळी व तसेच मिरवणूक मार्गावर जंतुनाशक व दुर्गंधी नाशकांची फवारणी करणे, रस्त्यावर पडलेले बांधकामाचे साहित्य तसेच इतर रहदारीसाठी अडथळे ठरणाऱ्या बाबी त्वरित दूर करणे, गणेश मूर्तीचे विसर्जन व दान केंद्रावर प्रत्येकी दोन कंत्राटी मदतनीस नियुक्त (२४ तास) करणे, Ammonium Bio-carbonate A Gradeयाची आवश्यकता (एकूण बॅग ची संख्या) त्वरीत मांडार विभागस कळविणे, विसर्जन दिवशी वाहनांसाठी मनुष्यबळ पुरविणे.

भांडार विभाग – विसर्जन खड्डयात प्लास्टिक पेपर टाकणे (गणेशमूर्ती विसर्जन करणेकामी) जाहीर निविदा प्रसिद्ध करणे. पुरवठा आदेश तयारकरणे. इ. संबंधित आदेश तयार करणे, Ammonium Biocarbonate A Grade निविदा मागविणे, पुरवठा आदेश देणे, सर्व कार्यवाही विहितवेळेत पूर्ण करणे, मूर्ती दान करावयाची ठिकाणे प्राप्त झालेल्या मूर्ती पावसात भिजू नये यासाठी आवश्यक ती सोय करणे, मूर्ती दान करणेविषयी लोक प्रबोधन व जनजागृती करणेकामी तसेच दिशा दर्शविणेसाठी आवश्यक ते फ्लेक्स तयार करणे, विसर्जन मार्गावरील गणपतीचे स्वागत करणेकामी आवश्यक ती व्यवस्था करणे. (शाळा चौक येथे मंडप, हार, नारळाची व्यवस्था करणे, खुर्च्या, टेबल / मंडप व बॅरेकेटींगची व्यवस्था प्रत्येक केंद्रावर करणे, नगरपरिषद क्षेत्रातील पारंपारिक पद्धतीने विसर्जन व मूर्तीदान करावयाच्या जागांवर मंडप व्यवस्था करणे. (मुख्य तलाव तसेच इतर ठिकाणी ) नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या चहा, नाष्टयाची व जेवणाची व्यवस्था करणे (विसर्जनाच्या दीड, पाच, सात व अनंत चतुर्थी या दिवशी, नगरपरिषदेमार्फत गणेश विसर्जनासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, केंद्रावरील मूर्ती वहन करणेसाठी आवश्यकतेनुसार वाहने उपलब्ध करून देणे, (छोटा हत्ती, टेम्पो)

उद्यान विभाग :- गणेशविसर्जन करणेकामी तयार करण्यात आलेल्या ठिकाणी खड्डे पाण्याने भरणे, रोटरी क्लब इनरव्हील, जल स्वच्छता दूत, पत्रकार व इतर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी मिटिंग घेणे.

आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग यांनी मिरवणुक मार्गावरील ज्या दुकानदारांनी दुकानासमोर शेड उभे केले आहे असे शेडकाढून घेवून मिरवणुक मार्ग मोकळा करुन देण्यासाठी सर्व दुकानदारांना नोटीसा देणेसाठी सुचना देण्यात आल्या. तसेच सार्वजनिक मंडळे व घरगुती गणेश मुर्ती पीओपीच्या असतील तर मुर्ती संकलन केंद्रातच मुर्ती देण्यात याव्यात .

गणेशमुर्ती शाडु मातीच्या असतील तरच विसर्जन कुंडातच विसर्जन करण्यात याव्यात यासाठी नगरपरिषदेच्या सर्व विभागांनी जनतेला आवाहन करावे अशा सुचना देण्यात आल्या.

वरील प्रमाणे सर्व कर्मचा-यांनी गणेशउत्सव २०२३ साठी काटेकोरपणे पूर्व तयारी करून शहरातील गणेश उत्सव आनंदाने व उत्साहाने पार पाडण्यासाठी तयारी करण्याच्या सुचना, एन. के. पाटील.मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद, यांच्या मार्फत देण्यात आल्या.

मूर्तीदान केंद्र (गाव विभाग) थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडेपाटील शाळेचे मैदान, जुने नगरपरिषद कार्यालय, शिव शंभू स्मारकजवळ, पाताळेश्वर मंदिर गावतळ्याजवळ, गोपाळे गुरुजी यांचे घराजवळ, बनेश्वर मंदिराजवळ. मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेचे मैदान, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव (स्टेशन विभाग) : संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!