मावळ

प्रसिद्धी माध्यमांनी कै. आवारे यांच्या संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करू नये – योगेश पारगे.

Spread the love

प्रसिद्धी माध्यमांनी कै. आवारे यांच्या संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करू नये – योगेश पारगे.By the media. Do not publish wrong news regarding Aware – Yogesh Parge.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १९ सप्टेंबर.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय कै. किशोर आवारे यांच्या 12 मे 2023 रोजी करण्यात आलेल्या नियोजनबध्द निर्घृण खून प्रकरणा बाबत पुन्हा एकदा नव्याने प्रसिद्धी माध्यमांनी गरळ ओकण्यास सुरूवात केली असून, प्रसिद्धी माध्यमांनी कै. किशोर भाऊ आवारे यांच्या करण्यात आलेल्या निर्घृण हत्ये बाबत चुकीच्या बातम्या पसरवू नये असे आवाहन जनसेवा विकास समितीचे संघटक योगेश पारगे यांनी केले आहे.

सदर गंभीर प्रकरण न्यायप्रविष्ठ असून या प्रकरणातील खुनाच्या कारणांची कारणीमीमांसा करताना प्रसिद्धी माध्यमांनी सत्याचा आधार घेणे आवश्यक आहे अथवा तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांचे कडून सदर खून प्रकरणाच्या कारणांबाबत रीतसर प्रेस नोट च्या आधारे बातमी प्रसिद्ध करणे गरजेचे आहे परंतु अशी कुठलीही ठोस माहिती नसताना देखील प्रसिद्धी माध्यमे चुकीच्या पद्धतीने बातमी प्रसिद्ध करीत आहेत तरीदेखील प्रसिद्धी माध्यमांना विनंती आहे की सदर प्रकरणांमध्ये कुठलीही बातमी प्रसिद्ध करताना तारतम्य बाळगणे आवश्यक आहे असे योगेश पारगे यांनी नमूद केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!