क्राईम न्युजमावळ

नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या, आरोपीची परंदवडी येथे गळफास घेवून आत्महत्या.

Spread the love

नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या, आरोपीची परंदवडी येथे गळफास घेवून आत्महत्या.Accused who attempted to molest a nine-year-old girl committed suicide by hanging himself in Parndavadi.

आवाज न्यूज लोणावळा प्रतिनिधी, २९ सप्टेंबर.

सदापूर येथे नऊ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरगांव पोलिस स्टेशन हद्दीतील परंदवडी येथे घडली.चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एका ९ वर्षीय चिमुरडी वर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवार दि.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सदापुर,ता. मावळ येथे घडली होती.या घटनेतील आरोपीचा अनेक स्तरातून शोध घेण्याची प्रक्रिया सुरु असताना आज दि.२९ रोजी परंदवडी येथील एका झाडाला ओढणीच्या साहाय्याने या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.विजय शशिकांत मालपोटे (वय 35 वर्षे ) असे गळफास घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

सोमवार दि.२५ रोजी सायंकाळी  सदापूर येथे आरोपीने   पीडित मुलीला चॉकलेट देण्याच्या आमिषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याची फिर्याद लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे या घटनेचा तपास करत असताना यातील आरोपीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार परंदवडी येथे उघडकीस आला आहे. याबाबत शिरगांव पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!