पर्यटनमावळसामाजिक

अनंत चतुर्दशी ला जोडून महात्मा गांधी जयंती पर्यत जोडून सुट्या आल्याने लोणावळ्याच्या पर्यटनस्थळाकडे गर्दी.

पर्यटकांनी लुटला निसर्ग सौंदर्याचा आनंद..

Spread the love

अनंत चतुर्दशी ला जोडून महात्मा गांधी जयंती पर्यत जोडून सुट्या आल्याने लोणावळ्याच्या पर्यटनस्थळाकडे गर्दी.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १ ऑक्टोबर.

अनंत चतुर्दशी ला जोडून महात्मा गांधी जयंती पर्यत जोडून सुट्या आल्याने लोणावळ्याच्या पर्यटनस्थळाकडे गर्दी दिसून आली. लोणावळ्यात मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीला सोडविण्यासाठी वहातूक पोलिसांना कसरत करावी लागत होती. भगवान महावीर चौकात, श्रीराम मंदिर चौकात व मिनुगॕरेज चौकात जेथून बस बसस्थानकामधून बाहेर पडतात , त्या चौकाचौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.

वाहतुकीसाठी अनेक ट्रॕफिक वार्डन असतानाही व वहातूक पोलिस असताना सुमारे अर्ध्यातासाने वाहने हळूहळू पुढे सरकताना दिसत होती. तुंगार्ली गावाकडे जाणाऱ्या मार्गावर, तसेच मावळापुतळा चौकातही वाहतूक संथ गतीने सुरू होती.तुंगार्ली धरणाचे परिसरात आज रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक सकाळपासून दाखल झाले.

पाण्यावर दगडी मारणे, सेल्फी काढणे , प्रिवेडींग शुटींग व फोटोग्राफी करणै यासाठी येथे प्रचंड गर्दी दिसली.
तुंगार्ली धरणाचे बांधावर सुरक्षेसाठी दुतर्फा काटेरी तार लावण्याचे काम सुरू असूनही, अनेक पर्यटकांची बांधावरून मुलामुलींचे बरोबर ये जा सुरू होती. पांगळोली, ठाकरवस्ती, धनगरवस्ती येथील श्री संत बाळूमामा, श्रीविठ्ठल रखुमाई मुर्तींचे मंदिरातही आज बरीच गर्दी दिसून आली.भंडारा लावून प्रसादाचा आस्वाद घेत भाविकांकडून व पर्यटका़कडून येथील मंदिराजवळ काहीवेळ थांबून टाटाचे वलवण धरणाचे मनोहरी दृश्य व हिरवागार डोंगरपरिसर, फुले, वृक्षवेली यांचे सौदर्य पाहण्यात पर्यटक मग्न झाले व निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!