आरोग्य व शिक्षणमावळ

पंतप्रधानांचे अवाहनाला प्रतिसाद देत पांगळोली, धनगरवस्ती येथील विद्यार्थ्यांच्यावतीने राबविली स्वच्छता मोहीम..

Spread the love

पंतप्रधानांचे अवाहनाला प्रतिसाद देत पांगळोली, धनगरवस्ती येथील विद्यार्थ्यांच्यावतीने राबविली स्वच्छता मोहीम..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १ ऑक्टोबर.

पंतप्रधानांचे अवाहनाला प्रतिसाद देत पांगळोली , धनगरवस्ती येथील विद्यार्थ्याच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविली .येथील संत बाळुमामा यांचे मंदिराबाहेर रस्त्यावर, तसेच मंदिर परिसरात स्वच्छतेचा संदेश देत धनगरवस्ती, ठाकरवस्ती वपांगळोलीतील दहा पंधरा विद्यार्थी व शिक्षकांनी ही मोहीम राबविल्यामुळे परिसरात चैतन्य आलेले पहायला मिळाले.

येथील ग्रामस्थांतर्फे बांधलेल्या संत श्री बाळुमामा मंदिरामुळे व वलवण धरणाचे वर, तुंगार्ली धरणाच्या बाजूला असलेल्या या निसर्गाने नटलेल्या परिसरात येथे मंदिराचे आवारात कचराकुंडी, व घरोघरी डस्टबीन वाटप केल्यास कचरा साचणार नाही. याबाबत ग्रामपंचायतीचे वतीने काळजी घेण्याची गरज आहे.

आज ही स्वच्छता मोहीम लोणावळा नगरपरिषद प्रशासनातर्फे तुंगार्ली धरणाजवळही राबविण्यात आली. येथील शाळेचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून येथे पहाटे सहा ते सकाळी अकरा पर्यत हे स्वच्छता अभियान तुंगार्ली धरणाजवळचा परिसर स्वच्छ करताना दिसले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!