आरोग्य व शिक्षणसामाजिक

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देहुरोड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात अनेक संस्थांचा सहभाग..

Spread the love

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देहुरोड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात अनेक संस्थांचा सहभाग..On the occasion of the birth anniversary of the Father of the Nation, Mahatma Gandhi, many organizations participated in the cleanliness campaign at Dehurod.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २ ऑक्टोबर.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देहुरोड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात अनेक संस्थांचा सहभाग होता.महात्माजी यांना आदरांजली म्हणून ता.०१ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छता पंधरवडा ‘ स्वच्छता ही सेवा ‘ (SHS) २०२३ अंतर्गत मोहीम देशभरात स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे.

यामध्ये शहरातील विविध शैक्षणिक संस्था, युवा क्लब,एनसीसी , एन वाय के एस , आर डब्लु ए एस . आदी कॉर्पोरेट कंपन्या,नागरिक इत्यादींना सहभागी करून घेऊन दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्रमदान,प्लॉगेथॉन ड्राइव्ह इ.उपक्रम राबविण्यात आले.

त्याअनुषंगाने श्री शिवाजी विद्यालय अँड जुनिअर कॉलेज, देहूरोड येथील व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या माध्यमातून स्वच्छता पंधरवडा- ‘स्वच्छता ही सेवा’ (SHS) २०२३ अंतर्गत दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यालयाची इमारत व त्यासभोवतालचा परिसर, देहूरोड बाजारपेठ रस्ता,रेल्वे स्टेशनलगतच्या परिसरामध्ये या समाजोपयोगी पर्यावरणपूरक कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीचा संदेश दिला.

यावेळी श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर काॕलेजच्या वतीने प्राचार्या सपकाळे मॅडम, विभाग प्रमुख. शैलेंद्रसिंग परदेशी,
सहकारी शिक्षक एस.एस.कोंडे, आर.आर.देशपांडे, डी.एच.रासकर, जे.एस.ओझर्डे, सेवक अनंता वाजे तसेच व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,श्री शिवाजी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, देहूरोड,येथील विद्यार्थीनी व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!