निधनवार्तामावळ

देवळेतील विवाहीत तरूणाचा अज्ञात वाहणाचे अपघातात मृत्यू..

देवळेतील स्मशानभूमित अंत्यसंस्कार.

Spread the love

देवळेतील विवाहीत तरूणाचा अज्ञात वाहणाचे अपघातात मृत्यू ; देवळेतील स्मशानभूमित अंत्यसंस्कार.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २ ऑक्टोबर.

देवळेतील विवाहीत तरूणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने डोक्याला गंभीर जखम होऊन अपघातात मृत्यू झाला.
आज देवळेतील स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात मृताचे पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील लोक, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सुमित जयराम कडू (वय-२९,रा-देवळे, ता-मावळ) असे मृताचे नाव असून ता.१ रोजी राञीचे १०.३० वा.सुमारास तेजस ढाबा येथे हा भीषण अपघात झाल्याचे लोणावळा ग्रामिण पोलिसांकडून सांगण्यात आले.लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार के.जे.दरेकर यांनी आपघाताचा पंचनामा करून मृताची खंडाळा येथे उत्तरीय तपासणी करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कै.सुमित कडू हे कामावरून लोणावळा येथून घरी देवळे येथे मुंबई पुणे महामार्गावरून पल्सर मोटारसायकल क्रमांक एम.एच१४,जी 3889 हिच्यावरून जात असताना लोणावळा पुणे बाजूला त्याला अज्ञात वाहनाने धक्का दिल्याने तो गाडीसह खाली पडला. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरात उडविल्याने त्याचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला.

आज सकाळी अकराचे सुमारास कै.सुमित याचे पार्थिव देवळे गावात आणण्यात आले. अंत्यसंस्कार प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य व श्रीकाळ भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष अनिलभाऊ आंबेकर व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर यांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली.भाजे विकास सोसायटी चे संचालक जयराम लक्ष्मण कडू हे त्याचे वडील होत.

तसेच लोणावळा ग्रामिणचे गृहरक्षकदलाचे कर्मचारी शांताराम कडू हे त्याचे चुलते होत. त्याचे पश्चात आई नीता जयराम कडू , ,वडील जयराम कडू , बहीण ज्योती आनिल पटेकर , कन्या श्रिया सुमित कडू , पत्नी सृष्टी सुमित कडू , सासरे दिनेश धोंडू जाधव , आखिल चर्मकार समाज सेवा फौडेशन , संत रोहिदास चॕरिटेबल ट्रस्ट पदाधिकारी व कडू व जाधव परिवार आहे.

कार्लातील जाधव परिवाराचे जावई असलेले कै.सुमित कडू यांचे मनमिळावू स्वभावामुळे ते मिञांमधे लोकप्रिय होते. त्यांनी दुर्ग संवर्धन मोहिमेमधे सहभाग घेतल्याचे त्यांचे मिञांकडून समजले. मृदूंगमणी असल्याने गावचे भजनामधे ते सक्रीय होते. मृदूंगवादनाचे शास्ञोक्त शिक्षण घेत आसल्याने वारकरी सांप्रदायाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
लोणावळा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक रविंद्र कडू हे त्यांचे चुलते होत.

महामार्गावर आपघाताची मालिका सुरूच आहे,
काही दिवसापूर्वी वलवण जवळ असाच गंभीर अपघात होऊन ताजेतील विवाहीत तरूणाचा मृत्यू झाला होता.
मुंबई पुणे महामार्गावर अपघाताचे सञ थांबत नाही. अनेक अपघात वेगात वाहने असल्याने होत असून जेथे जेथे रस्ता क्राॕसिंग आहे , त्या त्या ठिकाणी रिफ्लेक्टर व गतीरोधक पट्टे मारावेत, पण अनेक ठिकाणी वलवण, वाकसईफाटा, कार्लाफाटा येथे ते दिसत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!