मावळ

लोणावळा ग्रामीणचे पोलिसांकडून तपासकामासाठी होते दिरंगाई..

अज्ञात वाहनाचा चोवीस तासानंतरही शोध नाही.

Spread the love

लोणावळा ग्रामीणचे पोलिसांकडून तपासकामासाठी होते दिरंगाई ;अज्ञात वाहनाचा चोवीस तासानंतरही शोध नाही.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २ ऑक्टोबर.

लोणावळा ग्रामिणचे पोलिसांकडून तपासकामासाठी  दिरंगाई होताना दिसत असून टोलनाक्यावर सीसीटीव्ही फुटैज उपलब्ध असतानाही अज्ञात वाहनाचा चोवीस तासानंतरही शोध नाही.

लोणावळा ग्रामिणचे हद्दीतील तेजस ढाब्याजवळ ता.१ रोजी विवाहीत तरूण सुमित जयराम कडू (वय-२९) यांचा अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने आपघात होऊन मृत्यू झाला .या आपघात करणा-या वाहनाचा चोवीस तास उलटून गेले, माञ अद्यापही वाहनाचा तपास लागू शकलेला नाही.
माहिती लपविण्याचाच प्रयत्न पोलिसांकडून केला जात असून एरवी किरकोळ चो-या, भुरटे चोर, दारूधँदे यावर कारवाया केल्यावर पञकार परिषदा घेणाऱ्या पोलिसांकडून ही अपेक्षा नाही.

काही दिवसापूर्वी सदापूरचे हद्दीतील एका बंद फार्महाऊसचे वरांड्यात एका आल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला. सुदैवाने तेथे दोन आदीवासी तरूणांनी घटनास्थळाकडे जावून मुलीचे प्राण वाचविले.माञ आरोपी उघडा , नग्न आवस्थेत पसार झाला.फरारी झाला.हा बलात्काराचा गुन्हा करणा-या अरोपीचा चार दिवस शोध घेण्यात लोणावळा ग्रामिणचे पोलिसांना आपयश आले.
अखेर त्या आरोपीने परंदवडी (उर्से ), मावळ येथे एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

माहिती देणे नाकारली जाणे.माहिती देण्यास टाळाटाळ करणे.माहिती लपविणे. असे प्रकार पोलिसांकडून होत आसून त्यामुळे लोणावळा ग्रामिणचे पोलिसांचे कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!