पर्यटनलोणावळा

“ढाक भैरव ” ट्रेक पावसाळ्यात करु नये..

सलग चार ग्रुप या रस्त्यावर वाट भरकटले आहेत. शोध बचाव मोहीम

Spread the love

ढाक भैरव ” ट्रेक पावसाळ्यात करु नये, सलग चार ग्रुप या रस्त्यावर वाट भरकटले आहेत.शोध बचाव मोहीम.Dhak Bhairav ​​”Trek should not be done in rainy season, four consecutive groups have lost their way on this road. Search and Rescue Mission.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २ ऑक्टोबर.

काल दिनांक 01/10/2023 सायंकाळी 6.15 ला कॉल आला एक ग्रुप ढाक भैरवला जाताना रस्ता चुकला आहे. श्रीपाद तगलपल्लेवार, क्षितीज गजभिये, अन्शुळ शेंडे, शुभम वाघ, कुणाल ठाकुर, आशिष ठाकरे सर्व मुळ नागपूर, गोंदिया व नोकरी पुणे असे चुकलेल्या मुलांची नावे आहेत.
100 नंबर वर कॉल केल्यामुळे कर्जत, कामशेत पोलीस स्टेशनकडून सुध्दा कॉल आले.

शिवदुर्ग रेस्कु टिमचे दहा सदस्य लगेचच तयारी करून निघाले आठ वाजता चालायला चालू केले.
लोकेशन घेतलेले होते. एकाच ठिकाणी बसून रहा सांगितले होते.स्थानिक गावकरी व पोलीस पुढे शोधायला गेले होते. आम्ही पण मागे मागे मदतीला गेलो. त्यांनी ढाक गुहेकडचा रस्ता सोडून पुढे ढाक गावाचा रस्ता पकडला होता व गावाच्या जवळपास ते पोचले होते.

शिवदुर्ग मित्र लोणावळा, स्थानिक ग्रामस्थ
बाळासाहेब पवार, पोलिस पाटील, पोलीस कर्मचारी निंबाळकर, सातपुते, ए.पी.आय नम साहेब कामशेत पोलिस स्टेशन यांनी त्यांना जंगलातून सुखरूप बाहेर आणले. त्यांना चालताही येत नव्हते.

संततधार पाऊस, दाट धुके, अंधार, शेवाळलेल्या पाय वाटा यासारख्या अनेक अडचणींवर मात करीत रेस्कु ऑपरेशन रात्री साडेबारा वाजता संपले. सहा जणांचे जीव वाचले
शिवदुर्गची आजची टीम सुनिल गायकवाड, महेश मसने, योगेश दळवी, कपिल दळवी, अमोल सुतार, ओंकार पडवळ, सागर कुंभार, योगेश उंबरे, आनंद गावडे, प्रणय अंबुरे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!