नगरपरिषदमावळसामाजिक

मुख्याधिकारी एन के पाटील अकार्यक्षम, सक्षम अधिकारी नेमावा . दिनेश गवई.

Spread the love

मुख्याधिकारी एन के पाटील अकार्यक्षम, सक्षम अधिकारी नेमावा . दिनेश गवई.Principal NK Patil is inefficient, competent officer should be appointed. Dinesh Gavai.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३ ऑक्टोबर.

तळेगाव शहरातील नागरिकांच्या व माता भगिनींच्या तोंडचे पाणी पळालेले असताना मुख्याधिकारी एन के पाटील हे ऐन दुष्काळाच्या तोंडावर तळेगाव शहरातून गायब झाल्यामुळे मुख्याधिकारी यांचे तळेगाव दाभाडे शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आल्यामुळे तळेगाव शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्या साठी मुख्याधिकारी एन के पाटील हे अकार्यक्षम असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे तळेगाव शहराध्यक्ष दिनेश गवई यांनी नमूद केले आहे.

पूर्णवेळ शहरातील कामांचे नियोजन करणारा व मूलभूत प्रश्न मेहनत करून सोडवणारा मुख्याधिकारी तळेगाव शहराला लाभयला हवा,  पाटील यांच्या कार्यकाळात शहरात अनेक मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत पाण्याचा प्रश्न ज्वलंत असून अनेक माता भगिनींच्या तोंडचे पाणी पळालेले आहे, तळेगावतील कॉलनी अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, कचरा कुठेही टाकला जात आहे, शौचालयाचे नियोजन नाही तसेच सार्वजनिक शौचालय स्वच्छ नाहीत, स्ट्रीट लाईट व भुयारी गटारांचा प्रश्न भेडसावत असताना  एन के पाटील शहरातून गायब असणे हे खेदजनक आहे.

सदर मुख्याधिकाऱ्यांवर अकार्यक्षम मुख्याधिकारी म्हणून कारवाई करण्यात यावी व त्वरित त्यांची बदली करून त्यांच्या जागी एक सक्षम अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तळेगाव शहराध्यक्ष दिनेश गवई यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!