मावळसामाजिक

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्माईलींग स्टार ‘ स्तुत्य उपक्रम..

Spread the love

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्माईलींग स्टार ‘ स्तुत्य उपक्रम..’Smiling Star’ praise activity in Krishnarao Bhegade English Medium School..

आवाज न्यूज ; तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ ऑक्टोबर.

 

बालवयात संस्कार व सुप्त गुणांचा विकास.
तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलीत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्माईलींग स्टार ‘ या नवीन उपक्रमाचा सोहळा संपन्न झाला. भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, प्राचीन इतिहासाचे आकलन, सुसंवाद, व सुप्त गुणांना वाव मिळून सर्वांगीण विकास , हे उद्दिष्ट ठेवून या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी हया उपक्रमाच्या उद़्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी  राजश्री म्हस्के यांनी या नवीन उपक्रमास शुभेच्छा दिल्या. खजिनदार. गौरी काकडे कार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाल्या, लहान मुलांच्या सुप्तकलागुणांना वाव मिळून सामाजिक मूल्य वाढीस लागावी म्हणून संस्कार हे लहान वयातच झाले पाहिजे. यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे.  सोनल काकडे यांनी ही आपल्या भाषणात बोलताना सांगितले, की ज्या देशाचे संस्कार चांगले त्या देशाची संस्कृती चांगली आणि संस्कृती चांगली, तर देश.

त्यामुळे असे बाल संस्कार लहान वयातच हवे. परमेश्वराच्या चरणी ज्याप्रमाणे आपण नतमस्तक होतो, त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक झाले पाहिजे. हे बाल संस्कारावरच अवलंबून आहे, असे सांगून बाल संस्कराचे महत्त्व शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर यांनी पालकांना पटवून दिले. यावेळी शाळेच्या शिक्षकांनी गाणी, श्लोक, गोष्ट व नृत्य या कलांचे प्रात्यक्षिक केले. लहान मुले आनंदाने यात सामील झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह होता. हा उपक्रम शाळेच्या शिक्षिका. मीरा चव्हाण व श्रावणी देसाई राबविणार आहेत.

या स्तुत्य उपक्रमाचे नियोजन. अनुजा चिटणीस यांनी केले. यावेळी पालकवर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रसंगी पालकांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे स्वागत केले व उपक्रमास शुभेच्छा दिल्या. शाळेच्या सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. मोहिनी खोले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!