राजकीयलोणावळा

भाजपच्या वतीने मतदारनोंदणी अभियानात नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद

११७७ मतदारांनी केली मतदारनोंदणी.

Spread the love

भाजपच्या वतीने मतदारनोंदणी अभियानात नागरिकांकडून जोरदार प्रतिसादामधे ११७७ मतदारांनी मतदारनोंदणी केली.In the voter registration campaign on behalf of BJP, 1177 voters got registered in the strong response from the citizens.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ६ ऑक्टोबर.

 

भाजपच्या वतीने मतदारनोंदणी अभियानात तिसऱ्या दिवशी ११७७ नवीन मतदार यांचेकडून मतदारनोंदणी अर्ज भरून नोंदणी करून घेण्यात आली.ता.३ते ६ आॕक्टोबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी साडेसहा या वेळेमधे हे अभियान राबविण्यात येत आहे.

मावळ विधानसभा प्रभारी रविंद्र आप्पा भेगडे यांचे हस्ते तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.यावेळी भाजपचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड ,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, महिला शहराध्यक्षा योगिता कोकरे , लोणावळा नवनिर्वाचित शहराध्यक्ष अरूण लाड, हर्षल होगले, माजी सरपंच अर्जून पाठारे,  भाजप विद्यार्थी आघाडी विकास घारे, प्रविण शिंदे, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष शौकत शेख, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम मानकामे, शेखर दळवी, भाजपचे माजी शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, पदाधिकारी विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिमन्यु शिंदे, आदी उपस्थित होते.

आज दुपारी चार पर्यत सुमारे साडेतीनशे नवीन मतदारांनी आपले आधारकार्ड , फोटो व आवश्यक कागदपत्रे आणून येथे मतदार नोंदणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!