क्रीडा व मनोरंजनमावळ

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ॲथलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यश !!

Spread the love

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ॲथलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यश !!Students of Krishnarao Bhegde English Medium School achieved great success in the athletics competition!!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ११ ऑक्टोबर.

दिनांक ९ व १० ऑक्टोबर २०२३ रोजी मावळ तालुका स्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मुलांच्या १७ वर्ष वयोगटातील उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवम राय याने, तर तिसरा क्रमांक अभिषेक शेवकर याने मिळविला. (४×४००) रीले स्पर्धेत शिवम राय, अभिषेक शेवकर, विशाल इप्पर, पार्थ भेगडे व जीत थोरात या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.

तसेच ट्रिपल जंप मध्ये दुसरे स्थान सिद्धार्थ काकडे, तर तिसरे स्थान युगांत देशमूख याने मिळविले. १४ वर्ष वयोगटातील उंच उडीमध्ये दीपक यादव याने दुसरा क्रमांक मिळविला. लांब उडीमध्ये हितेश शिरसाट याने दुसरा क्रमांक मिळविला, तर आयुष दिघे याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. ५ किमी चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक गौरव चोरडिया, तर तिसरा क्रमांक चैतन्य येवले याने मिळविला. मुलींसाठी असलेल्या १७ वर्ष वयोगटातील उंच उडी स्पर्धेत दुसरा क्रमांक पायल लोहार हिने, तर तिसरा क्रमांक श्रेया झावरे हिने मिळविला. थाळी फेक स्पर्धेत समिक्षा राऊत हिने तिसरे स्थान, तर भाला फेकमध्ये दुसरे स्थान मिळविले. रीले स्पर्धेत मुलींनी तिसरा क्रमांक पटकाविला.

तसेच २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत स्वराली मराठे दुसरा क्रमांक, तर ४०० मीटरमध्ये पायल लोहारने तिसरा क्रमांक मिळविला. १४ वर्ष वयोगटातील लांब उडीमध्ये ईश्वरी बसारगे हिने प्रथम क्रमांक मिळविला. २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तनिष्का देशमूखने तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धा इंद्रायणी महाविद्यालय येथे पार पडल्या.

क्रीडा शिक्षक. सुवर्णा झणझणे व सचिन आंद्रे यांनी विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेसाठी सातत्याने तयारी करून घेतली. संस्थेचे संस्थापक. चंद्रकांत काकडे, अध्यक्ष. संदीप काकडे, खजिनदार. गौरी काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर व शाळेच्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!