आरोग्य व शिक्षणनगरपरिषद

मुख्याधिकारी एन के पाटील, नागरिकांची चेष्टा मस्करी करत आहेत का ? दिनेश गवई. वंचित बहुजन आघाडी, तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष.

Spread the love

मुख्याधिकारी एन के पाटील, नागरिकांची चेष्टा मस्करी करत आहेत का ? दिनेश गवई. वंचित बहुजन आघाडी.Is Chief NK Patil making fun of citizens? Dinesh Gavai. Vanchit Bahujan Alliance.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ ऑक्टोबर.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी  एन के पाटील यांनी तळेगाव दाभाडे शहरातील रस्ते रोज झाडले जात असल्याचा दावा म्हणजे नियमित टॅक्स भरणाऱ्या व शहरावर प्रेम असणाऱ्या नागरिकांची केलेली चेष्टा मस्करी असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडी तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष दिनेश गवई यांनी केला आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनुसार तळेगाव शहरातील रस्ते रोज झाडले जातात असा दावा करण्यात आला होता, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तळेगाव शहरातील रस्त्यांचा व कचऱ्याचा, कचरा डेपोचा तसेच अंतर्गत कॉलनीतील रस्त्यांचा संपूर्ण भेटी देऊन अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येत आहे की तळेगाव दाभाडे शहरातील कॉलनी अंतर्गत रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे.

 

यशवंत नगर मधील काही भाग, नाना भालेराव कॉलनी, जोशी वाडी, वतन नगर, गाव भाग, कचरा डेपो, या ठिकाणी फारच मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. नाना भालेराव कॉलनीतील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब आहेत तसेच तेथे मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.आजही कचरा डेपो घोरावडी येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. तेथील सफाई कामगारांना काम करणे मुश्किल झाले आहे. सफाई कामगारांना कोणत्याही पद्धतीचे सुरक्षा रक्षक किट पुरवले गेलेले नव्हते. तिथे उभा राहणाऱ्या माणसाला चक्कर येईल अशी परिस्थिती कचरा डेपोची झालेली आहे.सफाई कामगार देखील माणूसच आहे याची नैतिक जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांनी घ्यायला हवी.

सर्व ठिकाणी शासकीय यंत्रणेचा बोजवारा उडालेला असताना, मुख्याधिकारी यांनी सर्व काही ठीकठाक आहे हा केलेला दावा फोल ठरला आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे तळेगाव शहराध्यक्ष दिनेश गवई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!