महाराष्ट्रमावळसामाजिक

सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांचे जाहीर सभेसाठी मावळातून सकल हिंदू समाजातर्फे एक लाखांचे पाणी रवाना..

Spread the love

सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांचे जाहीर सभेसाठी मावळातून सकल हिंदू समाजातर्फे एक लाखांचे पाणी रवाना ..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १२ ऑक्टोबर.

मनोज जरांगे यांचे जाहीर सभेसाठी मावळातून सकल हिंदू समाजातर्फे एक लाख लिटर पाणी बिस्लेरी बाॕक्सचे रूपाने रवाना सभेच्या ठिकाणी पाठविण्यात आले.
मराठा आरक्षण आंतरवाली सराटी येथे सामाजिक कार्यकर्ते यांची ता.१४ रोजी जाहीर सभा होणार आहे.सुमारे वीस लाख लोक या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सुञांकडून समजले.

या सभेसाठी महाराष्ट्र राज्यातून लाखो मराठी बांधव येणार आहे. या सभेसाठी मावळ तालुका सकल मराठा समाजातर्फे सुमारे एक लाख लिटर पिण्याचे पाणी पाठविण्यात येणार असल्याने त्या दृष्टीने तयारी करून येथील समन्वयक गेली दहा दिवस झटत आसून मराठी बांधवांना पिण्याचे पाणी पाठविण्यासाठी आवाहन केल्याप्रमाणे सुमारे एक लाख रूपयाचे पिण्याचे पाणी जमा झाले असून ते पाठविण्यात आले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे , यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री.मनोज जरांगे पाटील यांचेकडून १७ दिवस आमरण उपोषण करण्यात आले . यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षण प्रश्न लवकरच मार्गी लावू , असे अश्वासन दिले होते.

दरम्यान मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येईल का , ज्यांच्या वंशावळीत कुणबी जातीचा उल्लेख आहे,  त्यांनाच कुणबी प्रमाणपञे देता येईल , असे चर्चेअंती समोर आले आहे. याबाबत चाचपणी सुरू आहे,असे मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकारने सांगितले होते. आद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने मराठा आरक्षण मिळावे , यासाठी ही प्रचंड सभा होणार असल्याचे व त्यासाठी पिण्याचे पाणी कमी पडू नये , यासाठी हे पाण्याचे बाॕक्स संकलन व सभेसाठी पोहोचविण्याचे कार्य मावळ सकल मराठा समाजातर्फे राबविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!