Puneसामाजिक

प्रदीप मानेंच्या प्रयत्नातून तरुणाचे अडकलेले २ लाख ६० हजार रुपये मिळाले परत..

Spread the love

प्रदीप मानेंच्या प्रयत्नातून तरुणाचे अडकलेले २ लाख ६० हजार रुपये मिळाले परत Through the efforts of Pradeep Mane, the youth’s stuck Rs 2 lakh 60 thousand was recovered

आवाज न्यूज :  पुणे प्रतिनिधी, १२ ऑक्टोबर.

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे पिंपरी चिंचवड संघटक प्रदीप माने यांनी एका इसमाची झालेल्या फसवणुकीत मदत करून त्याला त्याचे २ लाख ६० हजार रुपये मिळवून दिले आहेत.

अधिक माहितीनुसार, सुहास जगदाळे राहणार भोसरी यांची एका कार खरेदी विक्री धंदा करणाऱ्या व्यक्तीकडून फसवणूक झाली होती. ती व्यक्ती जगदाळे कडून गाडी घेऊन गेली. पण त्यांचे पैसे देत नव्हता. त्यांनी त्याच्याकडून पैसे घेण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याने देण्यास टाळाटाळ केली. यामध्ये दोन महिने उलटून गेले मात्र जगदाळे यांना आपले पैसे मिळाले नाहीत. शेवटी जगदाळे यांनी माने यांची मदत घेण्याचे ठरवले, व त्यांना भेटून घडलेली घटना सांगितली. माने यांनी याबाबत त्वरित सहकार्य करून जगदाळे यांचे पैसे मिळवून दिले. त्वरित पैसे मिळाल्याने जगदाळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे पिंपरी चिंचवड शहर संघटक प्रदीप माने यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!