मावळलोणावळासामाजिक

सर्वपिञी अमावस्या बैलपोळा निमित्ताने बैलजोडी खरेदीसाठी गर्दी.

Spread the love

सर्वपिञी आमावस्या बैलपोळा निमित्ताने बैलजोडी खरेदीसाठी गर्दी.Crowd to buy pair of bullocks on the occasion of Sarvapinthi Amaavsya bullocking.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १३ ऑक्टोबर.

बैल अमावस्या निमित्ताने बैलजोडी खरेदीसाठी गर्दी होत आहे. या आमावस्येला बैलपोळा सण मावळमधे साजरा करतात.पन्नास , शंभर रूपये ते दोन आडीच हजारापर्यत बैलजोडी लोणावळा , कार्लाफाटा येथे विक्रीसाठी आली आहे.

सर्वपिञी आमावस्या या आमावस्येला मावळ तालुक्यातील गावोगावी बैलपोळा सण मोठ्या उत्साहामधे शेतक-यांचे वतीने साजरा केला जातो.चार महिने ओला चारा खायला घालून बैलांची चांगली जोपासना केली जाते.
वर्षभर शेतात कष्ट करणा-या बैलांना आंघोळ घातली जाते, त्यांना रंगविले जाते.त्यांची शिंगे आॕईलपेंटने रंगवून त्यांना बेगड लावले जाते.गळ्यात घाटी, घुंगूर, शिंगाला गौंडे, कपाळपठ्टी , पाठीवर झूल टाकून बैलांना ओवाळून पुरणपोळी खाऊ घातली जाते..अशा या बैलपोळा सणाला साजरा करतानना चवराचे रंगवलेले गौंडे बांधले जातात.

काही शेतक-यांचे गोठ्यात आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बैलच राहिले नाहीत, ते शेतकरी त्यांचे हौसेने मातीचे बैल बनवतात. किंवा अनेक शेतक-यांचे पुञ मातीचे बैलजोडी ची खरेदी करतात.त्यांची पूजा करून नैवेद्य दाखवतात.

बळीराजा सुखी भव म्हणून शिवाचा नंदी शेतक-यांचे पुञाला आशिर्वाद देतात. महिला, पुरूष, लहान बच्चे कंपनीकडून बैलांची मनोभावे पूजा केली जाते.
त्यामुळे लोणावळा व कार्लाच्या फाटा येथे  खरेदीसाठी बळीराजांची गर्दी दिसली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!