नगरपरिषदमावळ

अनधिकृत बंधकामांबाबत मुख्याधिकाऱ्यांची चुप्पी… योगेश पारगे.

Spread the love

अनधिकृत बंधकामांबाबत मुख्याधिकाऱ्यांची चुप्पी…
योगेश पारगे.Chief Officer’s silence regarding unauthorized hostages…Yogesh Parrge

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर , २३ऑक्टोबर.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अंतर्गत अनाधिकृत बांधकामांबाबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री एन के पाटील यांनी सोयीस्करपणे मौन व्रत पाळले असल्याचा आरोप योगेश पारगे यांनी केला आहे.
तळेगावातील अनधिकृत बांधकामाबाबत मुख्याधिकारी एन के पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन देखील त्यावर मुख्याधिकारी कोणतीही कार्यवाही करताना दिसून आलेले नाहीत त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांचे अनाधिकृत बांधकामांना अभय आहे की काय? असा सवाल, तळेगाव शहरांमध्ये विचारला जात असल्याचा दावा योगेश पारगे यांनी केला आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या टाऊन प्लॅनिंग चे अधिकारी देखील अनधिकृत बांधकामाच्या अर्जाबाबत बोलण्यास तयार नाहीत, त्यामुळे एकंदरीतच अनधिकृत बांधकामांबाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे मुख्याधिकारी एन के पाटील हे अनभिज्ञ असून विकासाचे सोंग करत असल्याचा आरोप योगेश पारगे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!