क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

रोटरी ओपन जिम ” चा लोकार्पण सोहळा आमदार सुनील शेळके व नियोजित प्रांतपाल २४-२५ शीतल शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत विजया दशमीच्या दिनी संपन्न.

Spread the love

” रोटरी ओपन जिम ” चा लोकार्पण सोहळा आमदार सुनील शेळके व नियोजित प्रांतपाल २४-२५ शीतल शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत विजया दशमीच्या दिनी संपन्न.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २५ ऑक्टोबर.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या कडून Rotary Open Gym
चा लोकार्पण सोहळा आज विजयादशमी चा शुभमुहूर्तावर मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके व डिस्ट्रिक्ट 3131 चे नियोजित प्रांतपाल रो.शीतल शहा यांच्या हस्ते संपन्न झाला.

या सोहळ्यात तळेगाव दाभाडे येथील नागरिक व रोटरी सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
रोटरी प्रांत ३१३१ मध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे वेगळे,उलेखनिय प्रकल्प करत असून अध्यक्ष उद्धव चितळे आणि त्यांची टीम वर्षभर आणखी दर्जेदार प्रकल्प करतील ही आपल्याला खात्री आहे असे गौरवोद्गार काढले.

आमदार सुनील शेळके यांनी मी या क्लबचा सदस्य असल्याचा अभिमान असून,  भविष्य काळात ग्रामीण भागातील शाळा नूतनीकरासाठी तुम्ही जर पुढाकार घेतला तर ५० टक्के रक्कम माझी राहील अशी ग्वाही दिली.
अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कारले, सचिव श्रीसैल मेंथे यांच्या पुढाकारातून व प्रकल्प प्रमुख मंगेश गारोळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ओपन जिम साठी माजी अध्यक्ष. यादवेंद्र खळदे, दीपक शाह,आनंद असवले, डॉ सूर्यकांत पुणे, अशोक काळोखे, दीपक गंगोळी, निलेश वाघचौरे, संजय अडसूळ,डॉ गुरूप्रसाद कुलकर्णी,शशांक ओगले,चेतन नामजोशी,वेदांग महाजन यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद मुंगी,देवेंद्र कदम, ऋषिकेश कुलकर्णी, नितिन फाकटकर सर,मथुरे काका,राजू गोडबोले, हृषिकेश शेरिकर,प्रमोद दाभाडे, फर्स्ट लेडी अर्चना चितळे, दिपा कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!