क्रीडा व मनोरंजननगरपरिषदसामाजिक

रद्दीवाले, भाजीवाले आणि भंगारवाल्यांचा भोंगा बंद करा. वसंत भापकर.

त्यांच्या तक्रारी नगरपरिषद व तळेगाव दाभाडे येथील,पोलीस स्टेशनला देखील केल्याचे सांगितले.

Spread the love

रद्दीवाले, भाजीवाले आणि भंगारवाल्यांचा भोंगा बंद करा. वसंत भापकर.Close the bin of junk, vegetables and scraps. Vasant Bhapkar.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ५ नोव्हेंबर.

तळेगाव दाभाडे, ( स्टेशन) भागात यशवंतनगर, तपोधाम कॉलनी आणि इतरही परिसरातील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आम्ही सर्वजण या भाजीवाले आणि भंगारवाल्यांच्या भोंग्याला कंटाळलो आहे. प्रचंड मोठ्या कर्कश आवाजात विशेषतः रद्दी आणि भंगारवाल्यांचा भोंगा वेळी-अवेळी सुरु असतो. शांत व निसर्गरम्य वातावरणात खरतर एवढा डोके उठवणारा भोंगा लावण्याची आवश्यकता नाही.

नाजुकशी घंटी वाजवली तरी किमान १० घरांना तो आवाज सहज जाऊ शकेल एवढा शांत हा परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहत असल्याने त्यांच्या वयाबरोबर आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. आधीच नगर परिषदेच्या घंटागाडीने डोके उठवलय त्यापाठोपाठ भंगारवाल्यांनी सामाजिक जाणिवेतून भान राखून ही मंडळी व्यवसाय करत नसल्याचं आमचं स्पष्ट मत वसंत भापकर यांनी मांडले आहे. सूचना देऊन, विनंती करूनही यांचे भोंगे बंद होत नाहीत, यांना अभय कोणाचे ? असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक मंचाकडुन उपस्थित केला जात आहे.

त्यांच्या तक्रारी नगरपरिषद व पोलीस स्टेशनला देखील केल्याचे सांगितले गेले. वेळी अवेळी वाजणारे भोंगे बंद झाले नाही तर  दुसरा मार्ग अवलंबला जाण्याची वेळ येऊ शकते, असे नागरिक मंच तळेगाव दाभाडेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज न्यूजला सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!