ग्रामीणमावळराजकीय

भाजेमधे तीन वार्डामधे चुरशीने शांततेत मतदान..

Spread the love

भाजेमधे तीन वार्डामधे चुरशीने शांततेत मतदान..Voting in three wards in Bhaje was very peaceful.

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ६ नोव्हेंबर.

भाजेमधे तीन वार्डामधे चुरशीने शांततेत मतदान सुरू असून दुपारी साडेतीन पर्यत वार्ड क्रमांक
एक ते तीन मधे सुमारे ८६.२५ % मतदान झाले..
कुसगाव बुद्रूक येथिल वार्ड क्रमांक ३ मधील एका जागेसाठी ७४.२८ % मतदान झाले.

भाजेमधे दुपारी साडेतीनपर्यत वार्ड क्रमांक १ मधे ८२%, वार्ड दोन मधे ७५.९६% ;तर वार्ड क्रमांक ३ मधे ७४.०७% मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाच पर्यत तीन्ही वार्डामधून ८६.२५% मतदान झाले.
कुसगाव बुद्रूक मधे वार्ड तीनमधील एका जागेसाठी दोन बुथवर ७४.०३ व ७४.५४ % असे एकूण ७४.२८ % मतदान झाले.

लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली व लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सुमारे चार अधिकारी, तीस पोलिस कर्मचारी व तीस गृहरक्षकदलाचे जवान असा तगडा बंदोबस्त ठेवला होता.

भाजे मधील शाळेत मतदानाचे वेळी शंभर मिटर दूरवर तसेच कुसगाव येथील वळकाईवाडी येथेही शाळेबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. कुसगाव बुद्रूक मतदन केद्राचे बाहेर माजी जिल्हा परिषद सदस्या गंगाताई कोकरे, दोन्ही उमेदवार तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजेतील ग्रामपंचायतीचे निवडणुकीत मतदान बुथबाहेर श्री जाखमाता ग्रामविकास पॕनेल व विरोधी पॕनेल चे श्री जाखमाता परिवर्तन पॕनेल तर्फे सरपंच पदाच्या उमेदवार ओव्हाळ व भालेराव तसेच सदस्यपदाचे उमेदवार आणि आजीमाजी सदस्य , कार्यकर्ते उपस्थित होते.येथे पोलिसआधिकारी महेंद्र वाळुंजकर व कर्मचारी, गृहरक्षकदलाचे जवान हे आयपीएस आधिकारी सत्यसाई कार्तिक व पोलिसनिरिक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.भाजे ग्रामपंचायतीचे निवडणुकीत विकासकामे या मुद्यावर ही निवडणूक लढण्यात आल्याचे भाजेतील कार्यकर्त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!