मावळराजकीय

आमदार रवींद्र धंगेकर यांची ८ नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथे जाहीर सभा.

Spread the love

आमदार रवींद्र धंगेकर यांची ८ नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथे जाहीर सभा.Public meeting of MLA Ravindra Dhangekar on November 8 at Talegaon Dabhade.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ नोव्हेंबर.

पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध काँग्रेस आय कमिटीचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा दिनांक ८ नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथे दौरा असून तळेगाव दाभाडे येथे सायंकाळी ५ वाजता
योगीराज हॉल येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील काँग्रेस आय पक्ष संघटना मजबूत व्हावी व कार्यकर्त्यांना नवीन चेतना मिळावी यासाठी दीपावलीच्या पूर्वसंध्येला मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी कळवले आहे.

मावळ तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी योगीराज मंगल कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी केले आहे.

मावळ तालुक्यात काँग्रेस आय पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या बांधणीसाठी तसेच पक्षातील कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करणार असल्याचे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते रामदास काकडे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!