पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधवांवर यांचेवर राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याचा हल्ला..
पुण्यात नामदेवराव जाधव माध्यमांशी बोलताना हा प्रकार घडला..

पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधवांवर यांचेवर राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याचा हल्ला ; पुण्यात नामदेवराव जाधव माध्यमांशी बोलताना हा प्रकार घडला
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १८ नोव्हेंबर.
राज्यात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवलं असताना दुसरीकडे लेखक नामदेवराव जाधव सातत्याने शरद पवारांना टार्गेट करत होते. शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठ्यांना ओबीसीत न टाकता इतर समुदायाला ओबीसीत समावेश करण्याचा जीआर काढला होता. त्यामुळे मराठ्यांचे नुकसान झाले. इतकेच नाही तर शरद पवार हे मराठा नसून ओबीसी आहेत असं जाधवांनी म्हटलं होते. यावरून संतापलेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधवांवर हल्ला केला.
पुण्यात नामदेवराव जाधव माध्यमांशी बोलताना हा प्रकार घडला. शरद पवारांवर चुकीचे विधान केले म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासले. यापुढे पवारांविरोधात जो बोलेल त्यांना आम्ही सोडणार नाही असं संतप्त कार्यकर्त्यांनी म्हटलं. कार्यकर्त्यांनी नामदेव जाधवांना काळे फासले. त्यावेळी एका पोलिसाने जाधवांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांनी बळजबरीने जाधवांना काळे फासले. यावेळी जाधवांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार जिंदाबाद, राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबाद अशा घोषणा दिल्या जात होत्या.
या आंदोलनापूर्वी जाधव आणि शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यात विचारांची लढाई विचारानेच लढायला हवी. मी कागद दाखवतो, हे दंडुके दाखवतात. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे असं तुमचे नेते सांगतात, जर तुमच्या हातून असं कृत्य घडलं तर तुमच्या नेत्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल. जिजाऊंच्या वंशजाच्या तोंडाला काळे फासलं म्हणून तुम्हाला कदाचित यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर बसून आत्मक्लेष उपोषणाला बसावं लागेल असा इशारा नामदेवराव जाधवांनी दिला होता.
राजमाता जिजाऊ यांचे वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचेवर राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याचा भ्याड हल्ला ;तोडावर शाई फेकली , कारण होते राष्ट्रवादीचे नेते संस्थापक अध्यक्ष शरदचद्रजी पवार यांना ओबीसी म्हणून संबोधण्यात आले.
तसेच त्यांनी गेल्या काही दिवसांमधे जाहीरपणे.पवार हे ओबीसी आहेत. असे पुरावे असल्याबाबत पञकार परिषदा घेतल्याने राष्ट्रवादीचे कार्यकत्यांनी एके ठिकाणी कार्यक्रम स्थळी ते कारमधे बसण्याचे आधी त्यांचेवर धक्कबुक्की करत सुरक्षारक्षक याला बाजूला सारून शाई फेकत तोंडाला काळेही फासण्याचा प्रयत्न केला..यावेळी त्यांचे सुरक्षारक्षक यांनी प्राध्यापक.जाधव यांना संरक्षण देत कारमधे बसवत कार बंद करून ते निघून गेले..
जाधव यांनी छञपतीँच्या जीवनावर शिवाजी द मॕनेजमेंट गुरू तसेच श्रीमंत कसे व्हावे ! असे पंन्नासेक ग्रंथाचे लेखन केलेले आहे.या घटनेचे सोशलमिडीयावर नेटकरी यांनी दखल घेत आदरणीय मराठ्यांचे जाणते नेते , म्हणून प्रसिध्द शरदचद्रजी पवार व एनसीपी चे कार्यक्र्ते यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.