ताज्या घडामोडी

किन्हवली पोलिसांकडून ता.१४ रोजी चार पशुंना जीवदान.

Spread the love

किन्हवली पोलिसांकडून ता.१४ रोजी चार पशुंना जीवदान.Kinhwali police killed four animals on 14th.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १९ नोव्हेंबर.

किन्हवली पोलिसांकडून ता.१४ रोजी चार पशुंना जीवदान मिळाले. चारही पशु कत्तलीसाठी एकाच वाहनात कोंबून चालवले होते. या धडक कारवाईमुळे पोलिसांचे सर्वञ कौतुक होत आहे.

ता.१४ रोजी किन्हवली पोलीसांच्या कार्यवाहीत पशुना जीवदान मिळाले. कत्तली साठी चालवलेल्या एक म्हैस व तीन 3 टोणे यांना एका पिकपमध्ये दाटीवाटीने कोंबुन कत्तली साठी घेऊन जाताना मोठ्या शिफारशी बच्छाव साहेब याच्या मार्गदर्शनाखाली किन्हवली पोलीसांनी कार्यवाही केली व दोन आरोपी व वाहतूक करणारे वाहन यांना ताब्यात घेतले.

तसेच या चारही जनावरांना चारा वैद्यकीय सुविधा आणि सांभाळण्याची जबाबदारी कृष्ण मातोश्री गो शाळा फांगणे. संस्थापक अध्यक्ष आशोक केदार पाटील यांनी घेतली आहे.
या धडक कार्यवाही मुळे किन्हवली पोलीसांचे सर्व थरावर कौतुक होत आहे. याबद्दल श्रीकृष्ण मातोश्री -गोशाळा फांगणेचे संस्थापक आशोक केदार पाटील यांनी बच्छाव साहेब व किन्हई पोलिसांचे मनोमन आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!