
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा येथे १८ व्या शाखेचा वाघोलीत शुभारंभ ; पुण्याच्या पूर्व भागात विखुरलेला ब्राह्मण समाज एकत्र करण्याच्या दृष्टीने आज एक सकारात्मक पाऊल.Inauguration of 18th branch of All India Brahmin Federation in Pune District at Wagholi
आवाज न्यूज : श्रेयश परदेशी पुणे प्रतिनिधी, १९ नोव्हेंबर.
पुण्याच्या पूर्व भागात विखुरलेला ब्राह्मण समाज एकत्र करण्याच्या दृष्टीने आज एक सकारात्मक पाऊल पडले, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वाघोली शाखेचा शुभारंभ झाला. वाघोली, केसनंद, खराडी, मांजरी खुर्द मधील काही भाग या शाखेच्या अंतर्गत येतो.बहुभाषिक, कॉस्मोपॉलिटन संख्येच्या भागात विखुरलेला ब्राह्मण समाज एकत्र करणे हे एक मोठे आव्हान असणार आहॆ.
डॉ योगेश जी अनगळ,जिल्हा सरचिटणीस (महिला आघाडी) आकांक्षा देशपांडे व अभिजित देशपांडे यांनी यशस्वी पुढाकार घेतला. यनिमित्ताने ABBM ची शाखा क्रमांक 18 अस्तित्वात आली.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, यांनी महासंघाच्या कार्याची व ध्येयउद्दिष्टे याची माहिती दिली तसेच उपस्थितांच्या मनातील शंकाचे निरसन केले.
या बैठकीला मंदार रेडे, आकांक्षा देशपाडे, अभिजीत देशपांडे, योगेश अनगळ, तुषार कुलकर्णी, अनुजा कुलकर्णी, रश्मी कुलकर्णी, प्रिती अनगळ, मुग्धा अनगळ, सतिश कुलकर्णी,सुरेश कुलकर्णी, सुरेखा कुलकर्णी , प्रसाद कुलकर्णी, राहुल तिवारी, अद्वैत कुलकर्णी,पर्जन्य कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी आगामी तीन महिन्यात प्रत्येकाने किमान दहा ब्राह्मण सदस्य संघटनेशी जोडण्याचा निश्चय करण्यात आला.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्ह्याची घोडदौड अतिशय वेगाने होत आहॆ हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहॆ.