
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात, भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींची जयंती साजरी.In Talegaon Dabhade Municipal Council office, former Prime Minister of India Shri. Indira Gandhi’s birth anniversary celebration.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १९ नोव्हेंबर.
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात, भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींची जयंती साजरी करण्यात आली.तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल टकले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सभा कामकाज प्रमुख भास्कर वाघमारे, करसंकलन लिपिक प्रवीण माने, नाईक अनिल इंगळे, चंद्रशेखर खंते, सुरेश आढागळे, विठ्ठल यादव व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त शपथ घेतली.