जनसेवा विकास समितीची धुरा रामदास आप्पा काकडे यांनी सांभाळावी… योगेश पारगे

जनसेवा विकास समितीची धुरा रामदास आप्पा काकडे यांनी सांभाळावी… योगेश पारगे.Ramdas Appa Kakade should be the head of Janseva Vikas Samiti… Yogesh Parge.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर १९ नोव्हेंबर.
जनसेवा विकास समितीची धुरा रामदास आप्पा काकडे यांनी सक्षमपणे सांभाळावी अशी अपेक्षा जनसेवा विकास समितीचे संघटक व तळेगाव दाभाडे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी किशोर भाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त व्यक्त केली आहे.
किशोर भाऊ आवारे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊन गोरगरीब नागरिकांची हयात सेवा करण्याचे काम केले आहे. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत कै.किशोर आवारे गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढा देत होते. 12 मे 2023 रोजी किशोर भाऊ आवारे यांची नगरपरिषद कार्यालय मध्ये निर्गुण पणे हत्या करण्यात आली होती. किशोर भाऊंचा जयंती दिवस 19 नोव्हेंबर रोजी, अत्यंत दुःखद अंतकरणाने सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली देऊन करण्यात आली.
कै किशोर भाऊ आवारे हयात असताना त्यांनी त्यांचे मामा रामदास आप्पा काकडे यांचे मार्गदर्शन घेतले होते ,तसेच जनसेवा विकास समिती च्या वाटचालीमध्ये रामदास आप्पा काकडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते, हे सर्वांना ज्ञात आहे.त्यामुळेच जनसेवा विकास समितीची धुरा रामदास आप्पा काकडे यांनी सक्षमपणे सांभाळावी अशी अपेक्षा जनसेवा विकास समितीचे संघटक व तळेगाव दाभाडे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी व्यक्त केली आहे.