आपला जिल्हापर्यटनमावळलोणावळा

सहा. पोलीस अधीक्षक. सत्यसाई कार्तीक यांनी आतवण टायगर पॉईंट येथील वेळेचे निर्बंध न पाळणारे ४ व्यवसायीक तसेच गोंधळ करणारे १४ पर्यटकांवर केली कारवाई.

Spread the love

सहा. पोलीस अधीक्षक. सत्यसाई कार्तीक यांनी आतवण टायगर पॉईंट येथील वेळेचे निर्बंध न पाळणारे ४ व्यवसायीक तसेच गोंधळ करणारे १४ पर्यटकांवर केली कारवाई.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत , २० नोव्हेंबर.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक. सत्यसाई कार्तीक यांनी स्वतः पथकासहलोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीमधील मौजे आतवण ता. मावळ जि. पुणे गावचे हद्दीधील टायगर पॉईंट या पर्यटन स्थळावर दि. १९/११/२०२३ रोजी ०१:०० वा. चे सुमारास वेळेचे निर्बंध न पाळता ४ टपरी व्यवसायीकांनीआपला व्यवसाय चालू ठेवलेल्या स्थितीमध्ये मिळून आलेने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३(डब्ल्यू) अंतर्गत तसेच सदर ठिकाणी पर्यटनाकरीता आलेले १४ पर्यटक गोंधळ करुन शांतता भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांचेविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदयातर्गत कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वीही याच ठिकाणी अशाप्रकारे कारवाई करण्यात आली असून यापुढेही सदर ठिकाणी व्यवसाय करणारे व्यवसायीकांनी वेळेचे निर्बंध पाळून सकाळी ०६:०० वा. पासून ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत आपला
व्यवसाय करावा. पर्यटनाकरीता आलेल्या पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे गोंधळ गोंगाट करुन सार्वजनीक शांतता
भंग करु नये व कोणीही दारुचे सेवण करुन वाहन चालवू नये असे लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक. सत्यसाई कार्तीक यांनी आवाहन केले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक. अंकित गोयल सो. यांचे मार्गदर्शनाखाली, मा.सत्यसाई कार्तीक, सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग लोणावळा, व त्यांचे पथकामधील सहा. पोलीसनिरीक्षक / सचिन राउळ, पो. हवा. / अंकुश नायकुडे, म. पो.हवा. / आशा कवठेकर, पो.
शि. / अंकुश पवार, सुभाष शिंदे,लोणावळा ग्रामीण पोलीस स्टोनचे पोलीस कडील पोलीस उपनिरीक्षक / श्री. सागर अरगडे, पो. हवा. / नितीन कदम,पो. शि. / केतन तळपे, राहुल खैरे, नागेश कमठणकर, लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक / लतीफ मुजावर, पो. शि/ भुषण कुवर, कामशेत पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक / शुभमचव्हाण, पो. शि/ अमोल ननवरे, वडगांव मावळ पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक / रुतुजा मोहिते,पो.हवा. / सचिन गायकवाड, पो. शि. / चेतन कुंभार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!