कुसगाववाडी विठ्ठल रखुमाई मंदिरात काकडाआरतीचा होतोय पहाटेचा गजर.

कुसगाववाडी विठ्ठल रखुमाई मंदिरात काकडाआरतीचा होतोय पहाटेचा गजर.Kusgaonwadi Vitthal Rakhumai Temple is the morning bell of Cucumber Aarti.
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २० नोव्हेंबर.
कुसगाववाडी विठ्ठल रखुमाई मंदिरात काकडाआरतीचा पहाटेचा गजर होत असून त्यामुळे गावासह पंचक्रोशित चैतन्य पसरताना दिसत आहे.पहाटे अडीच ते तीन वाजता मंदिरात पुजारी व स्पिकरवाले येतात. भक्तिगीते अभंग कर्णावर लावतात.तीन साडेतीनला विणेकरी व गायक , मृदूंगमणी जमले की काकडाआरती अभंग अलंकापुरी पुण्यभूमि पविञ ! या पासून सुरू होतो. राम कृष्ण हारी , भजन , रूप पाहता लोचनी हा अभंग झाल्यावर जयजयराम कृष्ण हारी ! भजन होते.
त्यानंतर पहिली मालिका , दुसरी मालिका , तिसरी मालिका , चवथी मालिका घेतात.मग देवाला पंचामृताने अभ्यंगस्नान घातले , की पोषाख घालतात. अलंकार घालतात.नंतर काकडा घेवून आरती होते. अभंग होतात. काकडाआरती चे अभंग रितीरिवाजाप्रमाणे होतात.
विठोबा रखुमाई चे भजन होते. अभंग झाल्यावर गवळणी घेतात.त्याआधी ज्ञानोबा माऊली ! भजन होते.!
गवळणीनंतर सर्व महिलांनी आणलेल्या आरत्या व ज्यांची पूजा असते ते एक , दोन , तीन यजमान सपत्निक किंवा एकटे पांडुरंगाची आरतीने ओवाळणी करतात.
आभंग गाताना आंधळा , पांगळा , मुका , बहिरा , वासुदेव , जोगी , तसेच ज्या त्या गावातील मुख्य काकडा चालक , वारकरी यांनी प्रथेप्रमाणे अभंग घेतले जातात. तसेच वाराचा आभंग घेतात..काही गावातील मंदिरात एकेरी म्हणतात , तर काही मंदिरात दोनदा म्हणतात.भूपाळी अभंग यालाही चांगली चाल लावली जाते.त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते.
आरतीनंतर तीर्थ प्रसाद , केळी , सफरचंद , पेरू , संञी , मोसंबी , असा काप केलेला फळांचा प्रसाद वाटप होतो.
या मंदिरात दररोज दोन , तीन भाविकांकडून काकडाआरती ची पूजा होते , त्यामुळे कधी वडापाव , कधी इडली चटणी , कधी मिसळ , कधी पावभाजी , तर कधी वडाउसळ असे पदार्थ सर्व भाविकांना प्रसादाचे रूपाने वाटप होते. काकडाआरती मधे अवघे हरिजण मिळोनि आले राऊळा ! दोन्ही कर जोडोनि विनविती गोपाळा ! !
काहो तुम्ही निश्चिंती निजलाहो हरी ! ! ..तळवे तळहाती टेकीत ! !
तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाशे ! !
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी ! !
रत्नजडीत सिंहासन ! वरी बैसले आपण ! !
कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख ! बहु वाटे दुं:ख फुटो पाहे हृदय ! !
उठा उठा प्रभात झाली ! ! , पासून सार्व वीसही अभंग उदा.
उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा ! आदी विठ्ठलाची आळवणी करणारे अभंग म्हटले जातात..काकडाआरती सुरूवात होण्याआधी सर्व पुरूषमंडळींना गंध लावतात..सर्वांचा उत्साह पोर्णिमेपर्यत कायम राहतो.
कुसगाववाडी , कुसगाव बुद्रूक प्रमाणेच सदापूर , पाटण , भाजे , घेरेवाडी , कुरवंडेमधील श्री कोराईदेवी मंदिरात , वाकसईमधे श्री हनुमान मंदिरात , दहिवली मधे तसेच शिलाटणे गावात हा काकडाआरती सोहळा उत्साहात होतो.वडगाव मावळ या तालुक्याचे गावात नगरपबाचायत असतानाही येथे श्रीपोटोबा जोगेश्वरी माता मंदिरात काकडाआरतीचा उत्साह आमाप असतो.येथे सुमारे सत्तरऐशी महिला व अडीचशे चेवर पुरूष भाविकांकडून काकडाआरतीसाठी गर्दी होते.ताजे , साते , या गावातही काकडाआरती होते.