मराठा क्रांतीवीर मनोज जरांगेचे लोणावळा शहरात जेसीबी ने पुष्पहार घालून जोरदार स्वागत.

मराठा क्रांतीवीर मनोज जरांगेचे लोणावळा शहरात जेसीबी ने पुष्पहार घालून जोरदार स्वागत.Maratha Krantivir Manoj Jarange was warmly welcomed by JCB in Lonavala city.
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २१ नोव्हेंबर.
मराठा क्रांतीवीर मनोज जरांगेचे लोणावळा शहरात जेसीबी ने पुष्पहार घालून जोरदार स्वागत खोपोली च्या सभेकरीता जाताना करण्यात आले.लोणावळा पर्यत वलवण येथे मुंबई पुणे द्रूतगतीमार्गावरून आलेले मराठा क्रांतीवीर मनोज जरांगे (पाटील ) यांचे सुमारे वलवण ते खंडाळा मार्गावर चार पाच जेसीबी मधून पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले.सुमारे एक टन वजनाचा पुष्पहार यावेळी मनोज जरांगे यांना मावळ तालुका सकल मराठा समाज तर्फे घालण्यात आला.
यावेळी तोफांमधून जोरदार रंगीबेरंगी कागद , फुलांचा वर्षाव करण्यात आला.,वलवण , गवळीवाडा, खंडाळा आणि फरियाजजवळ कुणेगाव मार्गावर.जरांगेचे जोरदार स्वागत करण्यात आले.असंख्य मोबाईलवरून त्यांची छबी टिपण्यासाठी व सेल्फी काढण्यात कार्यकर्ते गुंतले होते.