अध्यात्मिकनिधनवार्तालोणावळा

शिलाटणेमधील जेष्ठ किर्तनकार बबनमहाराज भानुसघरे यांचे निधन.

Spread the love

शिलाटणेमधील जेष्ठ किर्तनकार बबनमहाराज भानुसघरे यांचे निधन.Babanmaharaj Bhanusghare, a senior kirtan artist from Shilatane, passed away.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २१ नोव्हेंबर.

शिलाटणेमधील जेष्ठ किर्तनकार बबनमहाराज भानुसघरे (वय-७५) यांचे काल सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने राहते घरी निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुलगे, मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.

वै.भानुसघरे हे काही वर्षे कल्याणपूर कंपनीमधे आणि अनेक वर्षे ए.बी.सी.कंपनीमधे काम करत होते.
भातशेती सांभाळून प्रवचन, कीर्तनाचे आंग असणारे भानुसघरे यांनी संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थानाजवळ अखंड अनेक वर्षे सेवा केली.सप्ताह काळात काकडाआरती, गाथा पारायण, गाथा भजन, प्रवचन, कीर्तनाचे नियोजन राञी भजन आणि जेवण तयार करणारे आचारी ते चोपदार विणेकरी सर्व ठिकाणी त्यांचे बारकाईने लक्ष असायचे.

गावातील श्री.विठ्ठलाचे मंदिरातून पहाटे काकडाआरती करून घरी आल्यानंतर त्यांना सकाळी नऊचे सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.माञ उपचारापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

शिलाटणे येथील श्रीविठ्ठल मंदिरापासून स्मशानभूमित ट्रॕक्टर ट्राॕलीचे सजवलेल्या रथावर पार्थिव ठेवून वारकरी दिंडी काढण्यात आली होती. वै.भानुसघरे महाराज यांचे आकस्मितपणे निधनामुळे शिलाटणे गावावर शोककळा पसरली आहे.यावेळी मावळ तालुका दिंडी समाजाचे अनेक पदाधिकारी , व वारकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर, गायक, मृदूंगमणी, किर्तनकार ह.भ.प.रोहिदास महाराज धनवे, ह.भ.प.नंदकुमार वाळंज, किर्तनकार पांडुरंग गायकवाड, दत्ताञेय महाराज शिंदे, ह.भ.प.सुखदेव महाराज ठाकर, ह.भ.प.ठाकर महाराज,  संत तुकाराम महाराज पादुका स्थान सेवा ट्रस्टचे अध्यक्ष भरतशेठ येवले आदी उपस्थित होते.

वै.बबनमहाराज भानुसघरे हे वाकसईफाटा येथिल श्रीसंत तुकाराम महाराज पादुका सेवा ट्रस्टचे मुख्य पदाधिकारी होते.
अंत्यसंस्कार प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प.बळवंत महाराज येवले, ह.भ.प.मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे मार्गदर्शक व राजस्थान वारकरी सांप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष.रमेशचंद्रजी व्यास व मावळ तालुका दिंडी समाजाचे पंढरपूर धर्मशाळा बांधकाम अध्यक्ष माऊलीमामा शिंदे आदींनी श्रध्दांजलीपर भाषणे केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!