आंदोलनमावळसामाजिक

मराठा आरक्षण मागणीसाठी रिक्षाचालकांची ऐतिहासिक महारॕली.

लोणावळा, मळवली, कामशेत,  नायगाव व पुन्हा कार्लाफाटा महारॕली संपन्न.

Spread the love

मराठा आरक्षण मागणीसाठी रिक्षाचालकांची वेहेरगाव,
लोणावळा, मळवली, कामशेत,  नायगाव व पुन्हा कार्लाफाटा ऐतिहासिक महारॕली.Rickshaw pullers’ outpost for Maratha reservation demand,Lonavla, Malvali, Kamshet, Naigaon and again Karlaphata are historical Maharalli.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ३० नोव्हेंबर.

मराठा आरक्षण मागणीसाठी रिक्षाचालकांची वेहेरगाव श्रीएकविरा पायथा मंदिर ते कार्लाफाटा, वाकसई, वरसोली, वलवण, तुंगार्ली, गवळीवाडा, गावठाण, बाजारपेठ, भांगरवाडी, वळकाईवाडी, कुसगाव बुद्रूक, डोँगरगाव, औंढेखुर्द, औंढोली, देवले, भाजे पाटण, मळवली व कार्लाफाटा व कामशेत आणि नायगाव पेट्रोल पंप व पुन्हा कार्लाफाटा अशी भव्यदिव्य ऐतिहासिक अॕटोरिक्षा रॕली काढली होती.

सकल मराठा समाज यांचेवतीने मराठा आरक्षण चे क्रांतीवीर मनोजभाऊ जरांगे (पाटील) यांना मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी पुकारलेल्या लढ्याला सशर्त पाठिंबा देण्यासाठी वेहेरगाव व कार्लाफाटा , मळवली , तसेच वाकसई , देवघर आणि लोणावळा येथील शेकडो रिक्षाचालकांची ऐतिहासिक रॕली आज श्रीएकविरा देवी पायथा मंदिरात पुष्पहार घालून व नारळ फोडून सुरू झाली.

सकल मराठा समाजाचे सर्व रिक्षाचालकांनी या रॕलीमधे सहभागी होऊन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला. डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवे उपरणे, रिज्ञ
क्षावर भगवा झेंडा अशी शेकडो रिक्षाचालकांची रॕली निघाली. लोणावळा शहरातील मुख्य चौकात छञपती शिवाजीमहाराज पुतळा , मावळा पुतळा व महापुरूषांचे पुतळ्यास मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
भांगरवाडी येथे रांगेत आलेल्या रिक्षाचे रॕलीचे पुढे रिक्षावर ध्वनीवर्धकावर मनोजभाऊ जरांगे पाटील यांचे भाषण व घोषणा देत रॕली मार्गस्थ झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!