आंदोलनमावळसामाजिक

मावळ,पंचक्रोशित गावोगावी मराठा आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषण.

लोणावळा, खंडाळा, मळवली, वेहेरगाव, औंढेखुर्द, पाटण, बोरज पंचक्रोशित आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषण सुरूच.

Spread the love

 मावळ, पंचक्रोशित गावोगावी मराठा आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषण.लोणावळा, खंडाळा, मळवली, वेहेरगाव, औंढेखुर्द, पाटण, बोरज पंचक्रोशित आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषण सुरूच.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, ३ डिसेंबर.

लोणावळा, खंडाळा, मळवली, वेहेरगाव, औंढेखुर्द, पाटण, बोरज, दहिवली, कार्ला या पंचक्रोशित गावोगावी मराठा आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषण करण्यास प्रारंभ झाला आहे. दहिवली, खंडाळा येथे ता.१ पासून, तर औंढेखुर्द व औंढोली दोन्ही गावे मिळून शंकर महादेव मंदिरात साखळी उपोषण सुरू केले आहे. पाटण, बोरजमधे श्री काळभैरवनाथ मंदिरात, वेहेरगाव, मळवली या गावातून उपोषणास प्रारंभ झाला.

दहिवलीत स्वतः पोलिसपाटील यांनी भेट दिली.
लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक किशोर भोईर यांनी एका साखळी उपोषणाला भेट दिली. सदापूर, येथेही उपोषणास सुरूवात झाली.समाजसेवक व मराठा क्रांतीवीर मनोज जरांगे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली  गावोगावी साखळी उपोषणे करण्यात येत असून ता.१ ते २४ असे मागण्या मान्य होत नाही, आरक्षण मिळत नाही, तोपर्यत उपोषण चालूच राहणार आहे. असे सकल मराठा समाज तर्फे समन्वयक यांचेकडून प्रसिध्दी पञक काढण्यात आले आहे.

हे पञक नुकतेच छञपती संभाजीराजे यांना तळेगाव येथे कार्यक्रमासाठी आल्यानंतर कार्यकर्ते यांचेकडून देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!