मावळराजकीयलोणावळा

लोणावळ्यात रामदास आठवले यांचे जोरदार स्वागत.

भारतीय दलित पँथर पुन्हा भिमगर्जना करणार..

Spread the love

 

लोणावळ्यात रामदास आठवले यांचे जोरदार स्वागत ; भारतीय दलित पँथर पुन्हा भिमगर्जना करणार.Ramdas Athawale received a warm welcome in Lonavala; Indian Dalit Panthers will roar again.

आवाज न्यूज : मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ३ डिसेंबर.

रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया चे अध्यक्ष रामदास आठवले यांचे जेसीबीने पुष्पहार घालून जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय दलित पँथर पुन्हा भिमगर्जना करणार, असे वक्तव्य करून त्यांनी कार्यकत्यांना नवीन संदेश देत त्यांचेमधे चैतन्य आणले.

आर.पी.आय.आठवले गटचे व भारतीय बौध्दसभा यांचेतील विचारवंताच्या बैठकीत पुन्हा भारतीय दलित पँथर सुरु करण्याचा एकमताने निर्णय त्यांनी जाहीर केला.२ डिसेंबर रोजी -लोणावळा वळवन व्हिलेज रिसॉर्ट येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यीक, पत्रकारांशी आणि निवडक ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी विचार विनीमय करणारा वैचारिक संवाद केला.या वैचारिक संवादात चालु राजकीय घडामोडींवर साधक बाधक  चर्चा झाली.

या बदलत्या राजकीय सामाजिक घडामोडीत रिपब्लिकन पक्षाची भविष्यातील वाटचाल काय असेल यावर विचार मंथन करण्यात आले. त्यात सर्व विचारवंत, साहित्यीक, पत्रकार आणि कार्यकर्त्यानी सामाजिक संघटना म्हणून रिपब्लिकन पक्षांशी सलग्न असणा-या सामजिक संघटनेची स्थापना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

ज्या दलित पँथरच्या चळवळीतुन रामदास आठवलेंचे नेतृत्व उभे राहिले त्या भारतीय दलित पँथरची पुर्नस्थापना करावी, अशी या बैठकीत सर्वसंमतीने सुचना मंजुर झाली. त्यामुळे आगामी काळात ना. रामदास आठवले यांची भारतीय दलित पँथर ही पुन्हा एकदा भिमगर्जना करेल. आणि भारतीय दलित पँथरचे एक वादळ पुन्हा नव तरुणांमध्ये घोंगावतांना दिसेल. अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त
करण्यात आली.

१९७० च्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली. दलित पॅंथर राजा ढाले यांनी विसर्जित केल्यानंतर रामदास आठवले यांच्या पुढाकारात भारतीय दलित पॅंथरचे संगठन उभे राहिले. आणि ते देशभर भारतीय दलित पँथर रामदास आठवले यांच्या नेतृत्वात वादळासारखे घोंगावत राहिले. दलितांच्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रचंड मोठे आंदोलने केली. एक आक्रमक कृतीशील सामाजिक संघटन म्हणून भारतीय दलित पँथरचे देशभरातील दलितांचा विश्वास संपादित केला. त्या विश्वासावर रामदास आठवले यांच्यातला पँथर भिमगर्जना करीत देशभर आणि जगभर यांचे नेतृत्व पोहचले.

यापुढे पुन्हा ना. रामदास आठवले हे पँथरच्या आवेशात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात भिमगर्जना करणार आहेत. त्यामुळे नव्या पिढीच्या हाती भारतीय दलित पँथरच क्रांतीकारी आक्रमक संघटन ते सोपवणार आहेत. रामदास आठवले यांच्यातला पँथर पुन्हा अन्याय अत्याचारांवर झेप घेणार आहे. अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहर, मावळ तालुका पुणे जिल्हाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर रामदास आठवले  यांची दि वर्ल्ड बुद्धिस्ट संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल भव्य नागरी  स्वागत करण्यात आले, या बैठकीला विचारवंत साहित्यीक शरणकुमार लिंबाळे, अँड. दिलीप काकडे, वरिष्ठ पत्रकार राजा अदाटे रिपाइंचे अविनाश महातेकर, आजचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, गौतम सोनवणे, बाबुराव कदम, पप्पू कागदे, दिलीप जगताप, परशुराम वाडेकर, या बैठकीचे उत्कृष्ठ नियोजन पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष. सूर्यकांत वाघमारे यांनी केले यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार, पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, तालुका अध्यक्ष नारायण भालेराव, लोणावळा शहर अध्यक्ष कमलशिल आनंद म्हस्के, मावळ तालुका कार्याध्यक्ष अशोक सरवते, तुफेल शेक , यमुना साळवे, म्लान बनसोडे, अंकुश सोनवणे,राजू देसाई, रोहिने देसाई,जयराम कदम,महिंद्र देसाई,रमेश भालेराव,नंदू शेळके,कुशल वाघमारे,पंकज देसाई,मनोज भालेराव कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!