आरोग्य व शिक्षणलोणावळासामाजिक

व्हिपीएसचे सेवानिवृत्त प्राचार्य विजय जोरी यांची सहाय्यक जिल्हा आयुक्त पदावर नियुक्ती.

Spread the love

व्हिपीएसचे सेवानिवृत्त प्राचार्य विजय जोरी यांची सहाय्यक जिल्हा आयुक्त पदावर नियुक्ती.Retired VPS Principal Vijay Jori appointed as Assistant District Commissioner.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर  लोणावळा प्रतिनिधी ५ डिसेंबर.

व्हीपीएस हायस्कूल चे सेवानिवृत्त प्राचार्य. विजय जोरी यांची पुणे भारत स्काऊट गाईड, जिल्हा संस्थेत ‘सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) या पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत हिमालय वुड बॅज आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार प्राप्त जोरी सर २००८ पासून या पदावर कार्यरत असून, मधल्या काही काळात ट्रेनिंग कौन्सेलर पदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

शुक्रवार ता. २४ नोव्हेंबर रोजी स्काऊट गाईड राज्यपुरस्कार चाचणी पूर्वतयारी मेळावा समारोपप्रसंगी जिल्हा संघटन आयुक्त. दिगंबर कारंडे यांनी नियुक्तीची घोषणा करीत अधिकृत नियुक्ती पत्र जोरीसर यांना सुपूर्त केले.

याप्रसंगी जिल्हा संघटन आयुक्त (गाईड) उषा हिवराळे, ज्ञानसागर गुरुकुल बारामती चे अध्यक्ष. सागर आटोळे, जेष्ठ पत्रकार. मिलिंद संधान, कार्यकारिणी सदस्य मिलन जाधव, परीक्षक. कृष्णा तामकर व संजय खरमारे उपस्थित होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रा. जोरी यांनी जिल्हा मुख्य आयुक्त. शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा संघटक आणि कार्यकारिणीला धन्यवाद दिले, पूर्वतयारी मेळाव्यासाठी उपस्थित सुमारे दोनशे स्काऊट गाईड यांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या.

या नियुक्तीबद्दल जोरीसर यांचे विविध स्तरामधून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!