पर्यटनमावळलोणावळा

लोणावळा शहरातील जुना पुणे मुंबई हायवे रोडलगत व सहारा ब्रिजवर असलेल्या अनधिकृत मॅगी टपऱ्या, खादय पदार्थाचे टेम्पो, स्टॉल व दुकान धारकांवर लवकरच होणार कठोर कारवाई.

Spread the love

लोणावळा शहरातील जुना पुणे मुंबई हायवे रोडलगत व सहारा ब्रिजवर असलेल्या अनधिकृत मॅगी टपऱ्या, खादय पदार्थाचे टेम्पो, स्टॉल व दुकान धारकांवर लवकरच होणार कठोर कारवाई.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, ६ डिसेंबर.

लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असल्याने दर शनिवारी व रविवारी तसेच सुटीच्या दिवशी मोठया प्रमाणात पर्यटक व व्हि.आय.पी. तसेच देश विदेशातून पर्यटक येत असतात
त्यामुळे वाहतुकीची कोंडी होवून वाहतूक नियमन करावे लागते सदर वाहतुक कोंडीच्या येणा-या पर्यटकांना तसेच सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ मुंबई ते पुणे या महामार्गाचे कडेला मॅगी पॉईंट येथे बेकायदेशीरपणे
स्नॅक्स सेंटर व टपया हया कडेला अनधिकृत स्टॉल, टप-या अतिक्रमण करुन स्नॅक्स सेंटर
चालु करुन येणारे जाणाऱ्यांना विक्री करीत असतात त्या स्टॉल व टप-या वरुन अर्थिक
फायदयाकरीता वर्चस्वाची स्पर्धा निर्माण होवून त्यांचेत हाणामारी मध्ये रुपांतर झालेले आहेत.

त्यावरुन लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत.तसेच मँगी पॉईट या ठिकाणी लोणावळा बाजुकडून मुंबई बाजुकडे जाणारा रस्ता हा उताराचा असल्याने वाहने भरधाव वेगात येत असतात व येणारे जाणारे वाहन धारक हे रोडचे कडेला
वाहने दुर्तफा उभी करुन मॅगी पॉईट येथे चहापान व खादयपदार्थ खाण्यासाठी जात असतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

सदर लोणावळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 महामार्गाकडेला असलेले मॅगी
टप-या पुर्णपणे बंद होण्याकरीता व सहारा ब्रिजवर असलेले मॅगी विक्रीचे टेम्पो हातगाडे तसेच
टपरी हया पुर्णपणे बंद होणेकरीता लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी.सत्यसाई कार्तिक यांनी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे व मुख्याधिकारी लोणावळा नगरपरिषद लोणावळा यांचेशी पत्रव्यवहार केला आहे.
पोलीस निरीक्षक. लोणावळा शहर पोलीस ठाणे यांच्या कडून लौकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!