आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमावळ

भारत को जानो ‘प्रश्नमंजुषा स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर चे सुयश.

Spread the love

भारत को जानो ‘प्रश्नमंजुषा स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर चे सुयश.Saraswati Vidyamandir’s suggestion for ‘Know India’ quiz competition.

आवाज न्यूज ; तळेगाव दाभाडे वार्ताहर, ८ डिसेंबर.

भारत विकास परिषद यांच्यातर्फे दरवर्षी ‘भारत को जानो ‘ही प्रश्नमंजुषा आयोजित केली जाते. या प्रश्नमंजुषा अंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या भारता विषयी संपूर्ण माहिती पुस्तक स्वरूपात दिली जाते. त्यातील प्रश्न विद्यार्थ्यांनी अवगत करायचे असून यानिमित्ताने विद्यार्थ्यांची आपल्या देशामध्ये असलेल्या ऐतिहासिक, भौगोलिक, राष्ट्रीय ,शैक्षणिक, क्रीडाविषयक, इत्यादी ज्ञानात भर पडते व देशाविषयी त्यांना अभिमान वाटतो.

ही स्पर्धा शाखा,विभाग, प्रांत व राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असून विद्यार्थ्यांचा बौद्धिक कस यात लागतो. नुकत्याच झालेल्या शाखास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर यांचा मोठ्या गटात प्रथम क्रमांक आला असून तो गट प्रांत स्तरासाठी निगडी येथे स्पर्धेसाठी गेला होता .त्यात त्या गटाचा तिसरा नंबर आला असून त्यातील सहभागी विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी पंडित व कुमारी समीक्षा बिराजदार यांचे सरस्वती शिक्षण संस्था व सरस्वती विद्यामंदिर मधील सर्व संस्था सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे तर्फे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!