ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स व SK स्पोर्ट्स अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने आंतरशालेय क्रीडा स्पर्धा संपन्न. 

लायन अमित अगरवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉन बॉस्कॉ हायस्कूल येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.

Spread the love

लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स व SK स्पोर्ट्स अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने आंतरशालेय क्रीडा स्पर्धा संपन्न. Inter school sports competition concluded in association with Lions Club of Lonavala Legends and SK Sports Academy.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, ११ डिसेंबर.

लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स व SK स्पोर्ट्स अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने व लायन अमित अगरवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉन बॉस्कॉ हायस्कूल येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.

या मध्ये लोणावळ्यातील विविध शाळांमधील सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या स्पर्धेचे उद्घाटन लायन्स डिस्ट्रिक्ट 3234 D 2 चे प्रांत खजिनदार लायन राजेंद्र गोयल यांचे शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी रिजन चेअरमन लायन आनंद खंडेलवाल व झोन चेअरमन लायन अनिल गायकवाड विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लायन्स क्लब लोणावळा लेजेन्ड्स चे अध्यक्ष लायन सुरेश गायकवाड यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या स्पर्धांसाठी ऍक्टिव्हिटी चेअरमन लायन अमित अगरवाल यांनी बक्षिसे प्रायोजित केली. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लायन  नंदकुमार वाळंज यांनी रोख बक्षिसे दिली.या वेळी लायन सुरेश गायकवाड यांनी एका गरीब विद्यार्थिनीला शिक्षणासाठी ₹ १०,००० /- ची मदत केली.

क्लब चे सेक्रेटरी लायन विवेक घाणेकर, लायन राजेश मेहता, लायन सौ उमा मेहता, लायन विजय रसाळ, लायन डॉ हेमंत अगरवाल, लायन हेमंत पाटेकर यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहाय्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!