क्रीडा व मनोरंजनमुळशी

मानवी हक्क आयोग बरखास्त करा. ॲड. असीम सरोदे यांचे मत

मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेतर्फे कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान.

Spread the love

मानवी हक्क आयोग बरखास्त करा.
ॲड. असीम सरोदे यांचे मत, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेतर्फे कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान.Abolish the Human Rights Commission.Adv. Aseem Sarode’s opinion, Human Rights Protection and Awareness Organization honoring the achievers.

आवाज न्यूज : श्रेयश परदेशी, पुणे प्रतिनिधी ११ डिसेंबर.

मानवी हक्क आयोग हे बिनदातांचे वाघ आहेत. त्यांच्यावर दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च होतात. परंतु त्यांचा मानवी हक्क संरक्षणाचा उद्देश एक टक्काही सफल होत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील सर्व मानवी हक्क आयोग बरखास्त करावेत. तसे केल्यास सामान्यांचे कोट्यवधी रूपये वाचतील., असे ठाम मत मानवाधिकार वकिल ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इंन्सिट्यूट यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक मानवी हक्क दिनानिमीत्त ‘जागर मानवी हक्काचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पोलीस तक्रार प्राधिकरण अध्यक्ष आर व्ही जटाळे (निवृत्त न्याधीस सत्र न्यायालय), न्यायाधीश सोनल पाटील, सचिव – विधी सेवा प्राधिकरण, सुरेंद्रकुमार मानकोसकर (जीएसटी आयुक्त), समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष जाधव, श्याम आगरवाल संपादक, दैनिक आज का आनंद, तहसीलदार मदन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.

असीम सरोदे म्हणाले, मानवी हक्क विशेष न्यायालये सुरू करण्यासाठी कायदा पारित झाला. काही ठिकाणी तशी न्यायालयेही सुरू झाली परंतु लोकांना त्याविषयी माहिती नसल्याने त्यांचा वापर होत नाही. लोकअदालतीची जशी जाहिरात केली जाते तशी या न्यायालयांची जाहिरात केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

न्यायाधीश जटाळे म्हणाले की, “मानवी हक्काचे रक्षक असलेल्या न्याय व्यवस्थेने संवेदनशील मानवी हक्क उल्लंघनाची प्रकरणे हाताळणे गरजेचे आहे.”
यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी विधी सेवा प्राधिकरण आर्थिकदृष्ट्या मागास वंचीत घटकांच्या न्यायासाठी विधी साह्य देऊन त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण केले जाते. पैशाच्या अभावी कोणीही न्यायापासून वंचीत राहू नये पीडितांनी विधी सह्यासाठी प्रधिकरणाशी संपर्क करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमात दैनिक आज का आनंद चे संपादक यांनी वक्त के कागरपर आवो एक बात नयी लिखते हे बहुतोने लिखा हें कूच गलत गलत हम कुछ नया लिखते हैं. या कार्यक्रमात ॲड. असीम सरोदे यांनी मानवी हक्क संरक्षणाच्या यंत्रणा जर त्यांच्या आधिकारचा वापरच करणार नसतील तर त्या बंद करून मानवी हक्काचे स्पेशल कोर्ट करावेत अशी भूमिका मांडली. या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रातून मानवतेच्या दृष्टीने सामाजिक कार्य करीत असलेल्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या कार्याला अधिक स्फूर्तीबळ मिळावे याहेतूने त्यांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले.

या कार्यक्रमात मानवाधिकार पुरस्कार (शैक्षणिक क्षेत्रातून) मा. संजय चोरडिया, (विधीसेवा) – ॲड. रशीद सिद्धीकी, (कामगार क्षेत्र), सुरेश केसरकर (कोल्हापूर), (प्रशासकीय सेवा) पी. बी. माळी. (सामाजिक क्षेत्र) – शमीभा पाटील, (उद्योग क्षेत्रातून) रविराज धायगुडे यांना मानवाधिकार पुरस्काराने गौरविण्यात आले.

विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने संविधान प्रचारक लोक चळवळ, दिलासा संस्था पिंपरी चिंचवड पुणे, यांचा सन्मान होणार आहे तर विशेष कार्य सन्मान पुरस्कार, संविधान सखी संघटन मुंबई, अखिल भारतीय महिला शक्ती सेना पुणे, राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन, संघटित कष्टकरी कामगार संघटना बार्शी, ग्राहक हक्क संरक्षण समिती पुणे, महिला बचत गट पुणे, घर बचाओ घर बनवून आंदोलन संघटन मुंबई, सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बार्शी या संस्थांच्या सामाजिक कार्याला मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीने विशेष कार्य सन्मान पुरस्काराने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आला. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, संचालक अण्णा जोगदंड,यांनी दिली तर संस्थेच्या संयोजना मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर संगिता जोगदंड मिना करंजावणे, मनीष देशपांडे, हरिभाऊ मंजुळे शकील शेख आबास शेख,रवी भेंकी,या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!