आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमावळ

लायन्स क्लब तळेगाव आयोजित- शालेय साहित्य वितरण आणि विद्यार्थी मार्गदर्शन समारंभ दिनांक सात डिसेंबर रोजी संपन्न..

Spread the love

लायन्स क्लब तळेगाव आयोजित- शालेय साहित्य वितरण आणि विद्यार्थी मार्गदर्शन समारंभ दिनांक ७ डिसेंबर रोजी संपन्न..Lions Club Talegaon Organized- School Material Distribution and Student Guidance Ceremony concluded on 7th December..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ११ डिसेंबर.

प्रमुख वक्ते ला. डॉक्टर शालिग्राम भंडारी अध्यक्ष लायन डॉक्टर अनिकेत काळोखे प्रमुख पाहुण्या नगरपरिषद उपमुख्य अधिकारी ममता राठोड प्रकल्प अधिकारी ला. दीपक बाळसराफ ज्येष्ठ ला. भरत पोतदार लायन सुनील वाळुंज लायन. प्रियंका काळोखे खजिनदार लायन प्रकाश पटेल व दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक- वर्षा थोरात-  सुधीर बसवंतेसर व उपस्थित विद्यार्थ्यांच्या साक्षीने दीप प्रज्वलनाने समारंभाची सुरुवात झाली.

लायन अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखे यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करून दहावीच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी- वेळेचे नियोजन कसे करावे? करिअर कुठलं निवडाव ? हे मुद्दे विशद करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात! प्रोजेक्ट चेअरमन लायन दीपक बाळसराफ यांनी उत्कृष्ट शब्दात प्रमुख वक्ते लायन डॉक्टर भंडारींचा परिचय करून दिल्यानंतर लायन्स क्लबच्या या राबवल्या जाणाऱ्या व्याख्यानमाले मागील प्रमुख उद्देश- आपल्या मनोगतात व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भात विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी अनेक दृष्टांत कथा काव्यपंक्ती आणि शेरोशायरीतून हा विषय विद्यार्थ्यांना समजेल रुचेल पचेल अशा पद्धतीने सादर केला. शरीराची काळजी घ्यायची म्हणजे आहार विहार यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे हे आवर्जून त्यांनी सांगितले. त्यानंतर मानसिक आरोग्यासाठी- गुणसंपन्न मित्र जोडणे, ग्रंथाचे वाचन करणे, नेहमी सकारात्मक विचारातून कृतिशील असणे हे जेवढे आवश्यक आहे तेवढेच व्यासपीठावर व्यक्त होणे हे ही व्यक्तिमत्व विकासासाठी तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी दीर्घ प्राणायमच्या आधाराने उत्कृष्ट वक्तेही आपण होऊ शकतो असा आत्मविश्वास आपल्या व्याख्यानातून डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्रमुख पाहुणे- उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे  महेश हरीशचंद्रे- उपमुख्याधिकारी  ममता राठोड यांनीही आपले स्व अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. समारोपाच्या भाषणात मुख्याध्यापिका वर्षा थोरात मॅडमने संपूर्ण कार्यक्रमाचा अत्यंत अभ्यासपूर्ण परामर्श घेतला,  तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर बसवंते सरांनी तळेगाव लायन्स क्लबच्या या व्याख्यानमालेचे मनःपूर्वक आभार मानले. या दोन्ही शाळेतील विद्यार्थी सभागृहातून बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावरील चैतन्यदायी समाधान हीच तळेगाव लायन्स क्लबने सुरु केलेल्या या व्याख्यान मालेच्या यशाची खरी पावती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!