आरोग्य व शिक्षणमावळ

तळेगावच्या एनएमआयईटी अभियांत्रिकीस एनबीए नामांकन.

मावळ परिसरात नवीन नियमानुसार एनबीए नामांकन मिळालेले पहिलेच महाविद्यालय.

Spread the love

तळेगावच्या एनएमआयईटी अभियांत्रिकीस एनबीए नामांकन.NBA nomination for NMIET Engineering.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर,११ डिसेंबर.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या एनएमआयईटी या अभियांत्रिकी महाविद्यालयास नवीन नियमानुसार नुकतेच एनबीए चे मानांकन प्राप्त झाले आहे. कॉम्प्युटर , मेकॅनिकल आणि ई अँड टि सी या विभागास एनबीए चे नामांकन मिळाले आहे.

सुसज्ज इमारत, अनुभवी शिक्षकवर्ग, उत्तम शैक्षणिक दर्जा, कॅम्पस प्लेसमेंट, दर्जेदार निकालाची परंपरा, औदयोगिक आस्थापनांशी समन्वय अशी अनेक वैशिष्ट्ये असलेले हे महाविद्यालय मावळ परिसरात नवीन नियमानुसार एनबीए नामांकन मिळालेले पहिलेच महाविद्यालय ठरलेले आहे.

संस्थचे अध्यक्ष संजय ( बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच नूतन अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!