नगरपरिषदमावळसामाजिक

तळेगांव दाभाडे शहरातील गांव व स्टेशन विभागातील दोन्ही स्मशानभूमीतील नगरपरिषदेच्या गॅसदाहिन्या बंद.

मृतदेहासहित ( Dead body )  नातेवाईकांची पळापळ होऊन वेळ आणि आर्थिक भुर्दंड‌. दिलीप डोळस सामाजिक कार्यकर्ते.

Spread the love

तळेगांव दाभाडे शहरातील गांव व स्टेशन विभागातील दोन्ही स्मशानभूमीतील नगरपरिषदेच्या गॅसदाहिन्या बंद ; मृतदेहासहित  नातेवाईकांची पळापळ होऊन वेळ आणि आर्थिक भुर्दंड‌. दिलीप डोळस सामाजिक कार्यकर्ते.

Stopping of gas pipes in both cemeteries in village and station section of Talegaon Dabhade town; Relatives fleeing along with the dead body and wasting time and money.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १३ डिसेंबर.

तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार, तळेगांव दाभाडे शहरातील गांवभागातील व स्टेशन विभागातील दोन्ही स्मशानभूमीतील गॅसदाहिन्या बंद असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.दोन्ही ठिकाणी जाऊन आल्यावर नागरिकांना कळते की या बंद आहेत. मृतदेहासहित नातेवाईकांची त्यामुळे पळापळ होऊन वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आर्थिक भुर्दंड सोसून पारंपरिक पद्धतीने दहन संस्कार करावे लागत आहे. एक बंद असेल तर दुसरी तरी अत्यावश्यक बाब म्हणून पालिका प्रशासनाने कार्यान्वित ठेवायला हवी.गोरगरीबांना आयत्या वेळी लाकडांचा आठ दहा हजार रुपये खर्च परवडत नाही. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी आवाज न्यूज प्रतिनिधीना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!