निधनवार्तामुळशी

मित्रांबरोबर ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली येथे फिरायला गेलेला, रोहन विरेश लोणी याचा पाण्यात बुडून मृत्यू .

शिवदुर्ग टीमने घटनास्थळी पोहचुन पाण्यातून बॉडी शोधून, बाहेर काढण्यात आली.

Spread the love

मित्रांबरोबर ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली येथे फिरायला गेलेला, रोहन विरेश लोणी याचा पाण्यात बुडून मृत्यू ; शिवदुर्ग टीमने घटनास्थळी पोहचुन पाण्यातून बॉडी शोधून, बाहेर काढण्यात यश.Rohan Viresh Loni, who went for a walk with friends to Plus Valley in Tamhini Ghat, drowned.

आवाज न्यूज : मुळशी प्रतिनिधी, १३ डिसेंबर.

१२ डिसेंबर, दुपारी बाराच्या सुमारास पौड पोलीस स्टेशनचा कॉल आला. एक मुलगा रोहन विरेश लोणी वय वर्षे २१ मुळचा सोलापूर, पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने आलेला होता. मित्रांबरोबर ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली येथे फिरायला आले होते.अवघड ठिकाणी खाली उतरून पाण्याच्या कुंडात ही मुले पोहायला उतरली व त्यातील रोहन बुडाला होता.

प्लस व्हॅली जाण्यासाठी बरीच पायपीट आहे. मोठमोठे दगडगोटे, तीव्र उतार अशा ठिकाणीं जाणे येणे किंवा फोटो काढणे सोपे आहे पण एखाद्या जखमी व्यक्तीला किंवा मृत व्यक्तीला बाहेर घेऊन येणे कठीण आहे.

दुपारी साडे चार वाजता शिवदुर्ग टीम घटनास्थळी पोहचली पाण्यातून बॉडी शोधून, बाहेर काढून पॅक करण्यासाठी वेळ गेला संध्याकाळी सहा वाजता परतीचा प्रवास चालू केला अंधारात खडतर प्रवास करुन रात्री साडे नऊ वाजता बॉडी वर काढली.आपत्ती व्यवस्थापन संस्था मुळशीचे प्रमोद बलकवडे, मानगाव आपत्ती व्यवस्थापनाचे शेलार मामा, पौड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, वनखात्याचे कर्मचारी, अभयारण्य अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक संस्था मावळच्या टीमने भाग घेतला.

सचिन गायकवाड सर, महेश मसने, दिव्येश मुनी सर , अशोक उंबरे , सुनिल गायकवाड , योगेश उंबरे, प्रिंन्स बैठा , सागर कुंभार, योगेश दळवी, दुर्वेश साठे , अनिल आंद्रे, रमेश कुंभार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!