निधनवार्तामावळ

कार्लाफाटा येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने ठाण्यातील मोटारसायकलवर जागीच ठार

हेल्मेट असूनही जीव वाचला नाही.

Spread the love

कार्लाफाटा येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने ठाण्यातील मोटारसायकलवर जागीच ठार ; हेल्मेट असूनही जीव वाचला नाही.A motorcycle in Thane was killed on the spot after being hit by a speeding truck at Karlaphata; Despite the helmet, the life was not saved.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ६ जानेवारी.

कार्लाफाटा येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने ठाण्यातील मोटारसायकलवर जागीच ठार झाला. वेगरोधक पट्ट्यावरच हा भीषण आपघात घडल्याने शिलाटणे फाट्यावर झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती म्हणावी लागेल. आपघात इतका भीषण झाला , की हेल्मेट असूनही जीव वाचला नाही.

रोहीत गजानन राऊत (वय२९,रा-कानवे , ता-शहापूर , जिल्हा -ठाणे ) , असे मृताचे नाव असून तो कस्तुरी बांधकाम कंपनी, बाणेर येथे इंजिनियर म्हणून काम करीत होता व तेथेच रहावयास होता.त्याचेकडील होंडा कंपनीची हॕनिट माॕडेल मोटारसायकल क्रमांक एमएच ०४जे.जे.०४१३ हीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक क्रमांक एमएच ०५ईएल १४५५ हा असून त्यावरील चालक इंद्रकुमार जगतनारायण गुजराल (रा-घर क्रमांक ५, चाळ नंबर २,पो-वासार, धवलपाडा , नेवाळीनाका , अँबरनाथ ठाणे ),यास पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरचा आपघात ट्रकचालक इंद्रकुमार गुजराल याचेच चुकीमुळे झाला आहे. तरी ट्रक क्रमांक एमएच ०५ ई एल १४५५ वरील चालक याने त्याचे ताब्यात असलेला ट्रक क्रमांक मुंबई पुणे महामार्गावरून पुणे मुंबई लेनने स्वतः हयगयीने अविचाराने रस्त्याचे परिस्थितीकडे दूर्लक्ष करून जोरात चालविल्याने त्यास ट्रकचा वेग कंट्रोल न झाल्याने ट्रकची ठोस पुढे जाणाऱ्या खबर देणारे यांचे पत्नी चे मामेभावाचे मुलास रोहीत राऊत या याचे होंडा हाॕनिट मोटारसायकल ला बसून आपघात होण्यास व रोहीत याचे चेहऱ्याला, डोक्याला व छातीला गंभीर दुखापती होऊन त्याचे मृत्यूस व दोन्ही वाहनिंचे नुकसानीस कारणीभूत झाला,अशी फिर्याद देण्यात आली आहे.

घडलेला अपघात याबाबत लोणावळा ग्रामिणचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार योगेश वाघमारे हे सकाळी आकरा वाजता कामशेतला आपल्या ग्रँन्ड विस्टा कारने गेले होते, परत येताना मुंबई पुणे महामार्गावरून येताना दुपारी दोन वाजता कार्लाफाटा येथे दुर्गापरमेश्वरी मंदिरासमोर आले असता, त्यांचे समोर एक मोटारसायकलवर पुण्यावरून मुंबई बाजूकडे जात असता; अचानक एक पाठीमागून वेगाने आलेल्या ट्रकने त्याचा ताबा सुटल्याने त्याची ठोस मोटारसायकल चे उजव्या बाजूस बसली व मोटारसायकलवर ट्रकच्या पुढील चाकाखाली आला वा अपघात झाला.आपघातग्रस्त ट्रक जागेवर थांबला.लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनासाठी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक ए.जे.दरेकर यांनी सहकारी यांना खबर मिळताच तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेवून अपघातातील जखमीस कार्लाफाटा चे खाजगी रूग्णालयात दाखल केले, माञ त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. पोलिसांकडून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली व मृतदेह खंडाळा येथे उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अपघात दुपारी दोन वाजता घडला.गुन्हा र क्रमांक ११/२०२४असून ट्रकचालकावर भा.द.वि.कलम ३३८,३०४(अ),२७९ मोटार बा.का.क्रमांक १८४प्रमाणे सायंकाळी ५वा.२४मि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताची खबर योगेश यशवंत वाघमारे , (वय-३९,रा-वनोबा मंदिराजवळ, साठेवस्ती, कुसगाव, ता-मावळ),यांनी लोणावळा ग्रामिणचे पोलिसांना दिल्यावरून लोणावळा ग्रामिणचे पोलिसांनी पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. तसेच गंभीर जखमी झालेल्या व मरण पावलेल्या कै.रोहीत राऊत यास कार्लाफाटा येथील नित्यसेवा हाॕस्पिटलमधे दाखल केले होते. पण तो उपचारापूर्वीच मरण पावल्याचे पोलिसांनी नोँद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!