निधनवार्तामावळ

भाजे गावातील ज्येष्ठ महिला सविताताई वाघमारे यांचे निधन..

Spread the love

भाजे गावातील ज्येष्ठ महिला सविताताई वाघमारे यांचे निधन..Senior woman Savitatai Waghmare of Bhaje village passed away.

आवाज न्यूज :  मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.१३ प्रतिनिधी.

भाजे गावातील ज्येष्ठ महिला सविताताई सहादू वाघमारे (वय-६५ ) यांचे ता.९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांचे पश्चात पती , दोन विवाहीत मुलगे , सुना , चार विवाहीत कन्या , दीर , पुतने , जावा , अणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.भाजेचे माजी सरपंच सहादू वाघमारे हे त्यांचे पती , तसेच जर्मनी येथे काम करणारे व सहारा इंडिया येथे काम करणारे आय टी इंजिनियर चेतन वाघमारे व काशिनाथ वाघमारे हे त्यांचे सुपुञ होत. भाजे विकास सोसायटी चे माजी चेअरमन विठ्ठल वाघमारे आणि सकाळचे पञकार ज्ञानेश्वर वाघमारे हे त्यांचे दीर होत.माजी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र निवृत्ती वाघमारे , हे पुतने , कुरवंडे च्या माजी उपसरपंच.श्रध्दा आरूण मातेरे या त्यांच्या कन्या होत.

काकडाआरती , प्रवचन , कीर्तन , आदी धार्मिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या कै.सविताताई वाघमारे यांच्या आकस्मिकपणे निधनामुळे वाघमारे परिवार व भाजेगावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!