Puneक्रीडा व मनोरंजन

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित “ब्राह्मण क्रिकेट लीग 2024 चे आज दिनांक 13 जानेवारी रोजी दिमाखदार पद्धतीने उद्गाटन झाले.

Spread the love

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित “ब्राह्मण क्रिकेट लीग 2024 चे आज दिनांक 13 जानेवारी रोजी दिमाखदार पद्धतीने उद्गाटन झाले.The “Brahmin Cricket League 2024” organized by the All India Brahmin Federation was inaugurated today on 13th January in a grand manner.

आवाज न्यूज  : पुणे प्रतिनिधी, १३ जानेवारी.

पुण्यातील आठ संघ यात सहभागी झाले,माजी रणजी खेळाडू, प्रतिष्ठित मंडळी,अनेक युवक प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे या स्पर्धेला मुख्य प्रायोजकत्व लाभले आहॆ, AGAS MANAGEMENT यांचे आयोजन आहॆ.मुकुंदनगर तेथील कटारिया क्रिकेट ग्राउंड वर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

ब्राह्मण क्रिकेट लीग चे हे पहिलेच वर्ष आहॆ, पुढील वर्षी 32 संघ यात सहभागी होतील व अनेक महिला क्रिकेट संघांना यात सहभागी करुन घेण्यात येईल, या स्पर्धेद्वारे सुमारे 200 पेक्षा जास्त युवक महासंघाशी जोडले जातील व देशपातळीवर अनेक खेळाडू घडावे तसेच या युवकांच्या क्रिकेट कौशल्यला पुढे नेण्यासाठी महासंघाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन डॉ गोविंद कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात केले.

धावपळीच्या जीवनात युवकांमध्ये खेळाची भावना रुजली जावी, पर्यायाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहॆ. सत्यजीत कुलकर्णी, पुणे जिल्हा अध्यक्ष  मंदार रेडे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी  केतकी कुलकर्णी, गुरुनाथ कुलकर्णी, सुनील शिरगांवकर, अशोक भंडारी, लक्ष्मीकांत धडफळे  हे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्पर्धेची Cricket Jersey चे अवतरण करण्यात आले.

पुढील तीन आठवडे ही ब्राह्मण क्रिकेट लीग वाघोली व मुकुंदनगर या दोन ग्राउंड्स वर सुरू राहणार आहॆ, 04 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!