क्रीडा व मनोरंजनसामाजिक

श्री संत मुक्ताबाई विद्यालयात मित्रत्वाचे, ऋणानुबंध, कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत २३ वर्षांनी भरला सन २००० बॅच चा दहावीचा वर्ग.

माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक यांनी केला स्नेह संमेलन उत्साहात संपन्न....

Spread the love

श्री संत मुक्ताबाई विद्यालयात मित्रत्वाचे, ऋणानुबंध, कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत २३ वर्षांनी भरला सन २००० बॅच चा दहावीचा वर्ग ; माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक यांनी केला स्नेह संमेलन उत्साहात संपन्न….

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, १३ जानेवारी.

स्नेहसंमेलनामुळे आमच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना माजी शिक्षकांनी व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला तुम्ही सर्वांनी सुखदु:खात एकमेकांना आधार द्या, विधायक उपक्रम राबवा, आईवडिलांना सांभाळा, आपले व कुटुंबाचे नाव उज्ज्वल करा असा सल्लाही दिला.

शेळगाव येथील श्री संत मुक्ताबाई विद्यालयात सन २००० (दहावी बॅच) चा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. या स्नेहसंमेलनास माजी शिक्षकांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित शिक्षकांना व विद्यार्थ्यांना एक दिवस पुन्हा वर्ग भरल्याचा अनुभव मिळाला. शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर सर्वांना फेटे बांधण्यात आले. घोड्यावर बसून, फुले टाकून गेटपासून स्टेजकडे आणण्यात आले. माजी शिक्षकांनी परिपाठ घेतला. जे विद्यार्थी उशिरा आले होते त्यांना मायेची शिक्षा दिली. वर्गात गेल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षकांचे शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनी परिचय घेण्यात आला. मारुती कारंडे, काळेल सरांनी मनोगते व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला. हर्षल शेंडे या विद्यार्थ्यांने मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत असताना सर्व विद्यार्थी-शिक्षकांची गुणवैशिष्ट्य सांगितली. शिक्षकांना आमचा परिचय ऐकून खूप छान वाटले-आज बॅच मधील कोणी प्रगतशील शेतकरी, डॉक्टर, अभियंता, शिक्षक,आरोग्य सेवक, ग्रामसेवक, उद्योग-व्यवसायिक अशा अनेक क्षेत्रात आपले नाव आजमावत आहेत.

सर्वांच्या गप्पा रंगताना फोटोग्राफरने देखील आमचे हे आनंदाचे क्षन छान टिपले. शेवटी जेवणाचा आस्वाद घेण्यात आला. एक दिवस कसा गेला हे कळलेच नाही असे उदगार सर्वांच्या तोंडून ऐकू येत होते. आपल्या बॅच च्या वतीने शाळेला आवश्यक अशी भेटवस्तू देण्याचे ठरले. वर्षातून एकदा असे स्नेहसंमेलन घेण्याचे ठरले. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळा प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य केले.

अशी पाखरे येती आणि स्मृती ठेऊनी जाती या म्हणी प्रमाणे निरोप देताना सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.

सदर कार्यक्रमास माजी शिक्षक मारुती कारंडे, अंकुश कांबळे, दशरथ गावडे, चंद्रकांत तोडकर, दत्तात्रय पवार, तात्यासाहेब वाघमारे, आगवणे सर, काळेल सर, कांबळे सर, रजपूत मॅडम, सूत्रसंचालक धापटे सर, ह.भ.प.कीर्तनकार माऊली महाराज जाधव यांच्यासह माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

सूत्रसंचालन भारत ननवरे याने तर आभार सहदेव मोहिते या माजी विद्यार्थ्यांने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!