आरोग्य व शिक्षणमावळ

सरस्वती विद्यामंदिर मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी उत्साहात संपन्न.

सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, चिंचवड यांच्या सौजन्याने करण्यात आली.

Spread the love

सरस्वती विद्यामंदिर मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी उत्साहात संपन्न.Health examination of students completed in Saraswati Vidyamandir.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४ डिसेंबर.

सरस्वती विद्यामंदिर मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी उत्साहात संपन्न सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था ,चिंचवड यांच्या सौजन्याने करण्यात आली.

इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची रक्त तपासणी दिनांक 2 ते 4 डिसेंबर दरम्यान करण्यात आली. या तपासणीत वेगवेगळ्या आठ चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व विद्यार्थ्यांना त्यांच्यात असणाऱ्या आरोग्य विषयक कमतरते संदर्भात माहिती देऊन औषधोपचार देखील सांगण्यात आले. डोळ्यांची तपासणी करण्यात आली.

डॉक्टर्स असोसिएशन ऑफ देहूरोड येथील नऊ डॉक्टरांनी तपासणी केली. विद्यार्थिनींची तपासणी महिला डॉक्टरांनी केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय  सुरेश झेंड उपस्थित होते .त्यांच्या हस्ते स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष  प्रदीप पवार व उपस्थित डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला महिला डॉक्टरांचा सत्कार माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी केला. संस्थेतर्फे स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था येथील पदाधिकाऱ्यांचे व डॉक्टरांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!